कराची, 20 डिसेंबर : इंग्लंडने पाकिस्तानला तिसऱ्या कसोटीत 8 गडी राखून धूळ चारली. या विजयासह इंग्लंडने मालिका 3-0 अशी जिंकली. यासोबत बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली इंग्लंड क्रिकेट संघाने इतिहास घडवला. पाकिस्तानमध्ये कसोटी मालिकेत क्लीन स्वीप करणारा इंग्लंड हा पहिलाच संघ बनला आहे. पाकिस्तानने 2022 मध्ये घरच्या मैदानावर सलग दुसऱ्यांदा कोसटी मालिका गमावली. पाकिस्तानने याआधी मार्च 2022 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३ कसोटी सामन्याची मालिका 0-1 ने गमावली होती. तेव्हा ऑस्ट्रेलियाने मालिकेतील अखेरचा कसोटी सामना 115 धावांनी जिंकला होता. पाकिस्तानने घरच्या मादानावर सलग चौथ्यांदा पराभवाचा सामना केला आणि यासह त्यांच्या नावावर नामुष्कीजनक रेकॉर्ड नोंदवलं गेलं. हेही वाचा : दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा, रोहित शर्मासह आणखी एक क्रिकेटर दुखापतीमुळे बाहेर पाकिस्तान घरच्या मैदानावर सलग चार कसोटी गमावणारा आशियातील दुसरा संघ बनला आहे. याआधी बांगलादेशच्या नावावर हा नकोसा विक्रम आहे. बांगलादेशने 6 वेगवेगळ्या वेळी अशा प्रकारे सामने गमावले आहेत. बांगलादेशने 2001 ते 2004 पर्यंत घरच्या मैदानावर सलग 13 सामन्यात पराभव पत्करला होता. तर पाकिस्तानच्या क्रिकेट इतिहासात हे पहिल्यांदाच घडलं आहे. पाकिस्तानने घरच्या मैदानावर पहिली कसोटी मालिका 1955 मध्ये खेळला होता. तेव्हा 5 सामन्यांची मालिका बरोबरीत राहिली होती. कोणालाच तेव्हा एकही सामना जिंकता आला नव्हता. हेही वाचा : मेस्सीची हटके लव्हस्टोरी, बचपन का प्यार; दुराव्यानंतर एका अपघातामुळे पुन्हा आले एकत्र कराचीत झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय़ घेतला होता. पहिल्या डावात 304 धावा केल्या. त्यानंतर दुसऱ्या डावात इंग्लंडने 354 धावा केल्या. तर पाकिस्तानचा संघ दुसऱ्या डावात 216 धावा करू शकला. इंग्लंडने 167 धावांचे आव्हान 2 गड्यांच्या मोबदल्यात 28.1 षटकात पूर्ण करून सामना जिंकला. इंग्लंडच्या हॅरी ब्रूकने प्लेअर ऑफ द मॅच आणि प्लेअर ऑफ द सीरीजच्या पुरस्काराने गौरवण्यात आले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.