लंडन, 7 जून : इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूटने (Joe Root) न्यूझीलंडविरुद्ध (England vs New Zealand) झालेल्या लॉर्ड्स टेस्टमध्ये कमाल केली. चौथ्या इनिंगमध्ये शतक करत रूटने इंग्लंडला विजय मिळवून दिला, सोबतच टेस्ट क्रिकेटमध्ये त्याने 10 हजार रनचा टप्पाही गाठला, पण रूटच्या या खेळीपेक्षा त्याच्या बॅटचीच चर्चा सध्या सोशल मीडियावर जास्त होत आहे. याचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
या व्हिडिओमध्ये जो रूट नॉन स्ट्रायकर एण्डला उभा आहे. त्याची बॅट कोणत्याही सपोर्टशिवाय पिचवर उभी आहे. जसा रूट पुढे जातो तसा तो बॅट पुन्हा हातात धरतो. हा व्हिडिओ पाहून जो रूटला सोशल मीडियावर त्याचे चाहते जादूगार म्हणत आहेत.
Explain yourself @root66 https://t.co/ECL87LGevd
— Will Macpherson (@willis_macp) June 5, 2022
Ok… apparently Root now has flat-bottomed bats, not slightly curved as per usual. https://t.co/ECL87LGevd
— Will Macpherson (@willis_macp) June 5, 2022
Seriously is that bat holding itself up or is Joe Root even more of a magician?? @BumbleCricket @root66 #ENGvsNZ pic.twitter.com/bcHVvPngY4
— Webbo (@WebboOne) June 5, 2022
I knew @root66 was talented but not as magic as this……. What is this sorcery? @SkyCricket #ENGvNZ 🏏 pic.twitter.com/yXdhlb1VcF
— Ben Joseph (@Ben_Howitt) June 5, 2022
जो रूट 87 रनवर खेळत असताना काईल जेमिसन बॉलिंग करत होता. रूटचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगासारखा पसरला. लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून अनेकवेळा शेअरही झाला आहे.
हे कसं शक्य झालं?
जो रूटकडे जी बॅट आहे, त्याचा खालचा भाग पूर्णपणे सपाट आहे. क्रिकेटपटू वापरत असलेल्या बॅटना हलका व्ही शेप असतो, पण रूटची बॅट अशी नाही. बॅटचं वजन जास्त असल्यामुळे रूटला अशाप्रकारे बॅट उभी करण्यात अडचण आली नसेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: England, Joe root, New zealand