मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

...म्हणून मला टीममधून बाहेर काढलं, कार्तिकने सांगितलं कारण

...म्हणून मला टीममधून बाहेर काढलं, कार्तिकने सांगितलं कारण

दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) एमएस धोनी (MS Dhoni) आधीच 2004 मध्ये भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं, पण कार्तिकला भारतीय टीममध्ये स्वत:चं स्थान कायम करण्यात अपयश आलं.

दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) एमएस धोनी (MS Dhoni) आधीच 2004 मध्ये भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं, पण कार्तिकला भारतीय टीममध्ये स्वत:चं स्थान कायम करण्यात अपयश आलं.

दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) एमएस धोनी (MS Dhoni) आधीच 2004 मध्ये भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं, पण कार्तिकला भारतीय टीममध्ये स्वत:चं स्थान कायम करण्यात अपयश आलं.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 5 जून : दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) एमएस धोनी (MS Dhoni) आधीच 2004 मध्ये भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं, पण कार्तिकला भारतीय टीममध्ये स्वत:चं स्थान कायम करण्यात अपयश आलं. कार्तिकच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमध्ये अशीही एक वेळ आली जेव्हा त्याने उत्कृष्ट कामगिरी केली, पण काही काळानंतर त्याचा फॉर्म ढासळला, त्यामुळे कार्तिकला टीम इंडियामधलं (Team India) स्थान गमवावं लागलं. 2019 वर्ल्ड कपनंतरही (World Cup 2019) असंच झालं.

36 वर्षांचा कार्तिक भारताकडून अखेरची मॅच न्यूझीलंडविरुद्ध (India vs New Zealand) वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये खेळला. 240 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाचव्या क्रमांकावर बॅटिंगला आलेला कार्तिक 25 बॉलमध्ये फक्त 6 रन करून आऊट झाला. यानंतर त्याला टीम इंडियामधून बाहेर करण्यात आलं. पण 2021 आणि 2022 साली होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) आपण भारतीय टीममध्ये पुनरागमन करून फिनिशरची भूमिका बजावू शकतो, अशी आशा कार्तिकला आहे.

2018 साली निदहास ट्रॉफीच्या फायनलमध्ये कार्तिकने 8 बॉलमध्ये नाबाद 29 रन केले, ज्यामुळे भारताचा विजय झाला. या खेळीमुळे कार्तिकचं करियर पुन्हा पटरीवर आलं, तसंच फिनिशर आणि टी-20 स्पेशलिस्ट अशी ओळखही त्याला मिळाली. कार्तिकच्या नेतृत्वात तामीळनाडूने या वर्षी स्थानिक टी-20 स्पर्धा असलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये विजय मिळवला.

कार्तिकने क्रिकेटनेक्स्टला दिलेल्या मुलाखतीमध्ये आपली पुढचे दोन टी-20 वर्ल्ड कप खेळण्याची इच्छा असल्याचं सांगितलं. 'मी वय नाही तर आपण किती फिट आहोत ते बघतो. जर तुम्ही फिटनेस टेस्ट पास करू शकत असाल, तर तुम्ही देशासाठी खेळू शकता. माझं लक्ष्य टी-20 वर्ल्ड कप खेळणं आहे. यावर्षी आणि पुढच्या वर्षी दोन टी-20 वर्ल्ड कप होणार आहेत, त्यासाठी मी जे शक्य आहे ते सगळं करणार आहे,' असं कार्तिक म्हणाला.

'2019 वर्ल्ड कपपर्यंत मी चांगली कामगिरी केली होती. पण 2019 वर्ल्ड कप म्हणावा तसा गेला नसल्यामुळे मी टीममधून बाहेर झालो. टीममधून बाहेर झाल्यानंतर मी विचार केला की, आपण टी-20 क्रिकेटमध्ये भारतासाठी चांगली कामगिरी केली होती, पण वर्ल्ड कप नीट गेला नाही, म्हणून मी टी-20 टीममधूनही बाहेर झालो. भारताला फिनिशरची गरज आहे, हे मला निश्चित माहिती आहे. हार्दिक आणि जडेजा फिनिशर आहेत, पण मधल्या फळीत एका स्पेशलिस्ट बॅट्समनची गरज आहे, जो मॅच संपवूही शकतो,' अशी प्रतिक्रिया दिनेश कार्तिकने दिली.

आयपीएल 2020 आणि 2021 मध्ये दिनेश कार्तिकची कामगिरी निराशाजनक झाली. पण कार्तिकच्या अनुभवाचा टीम इंडियाला वर्ल्ड कपमध्ये नक्कीच फायदा होऊ शकतो. दिनेश कार्तिकने मागच्या 17 वर्षांमध्ये 26 टेस्ट, 94 वनडे आणि 32 टी-20 मॅच खेळल्या. टेस्टमध्ये त्याच्या नावावर 1025 रन, वनडेमझ्ये 1752 रन आणि टी-20 मध्ये 399 रन केले.

First published:

Tags: Cricket news, T20 world cup, Team india, World cup 2019