मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /T20WC: “गेल वॉर्नरच्या खिशात सँड पेपर तपासत आहे का?” सोशल मीडियावर 'त्या' फोटोने घातला धुमाकूळ

T20WC: “गेल वॉर्नरच्या खिशात सँड पेपर तपासत आहे का?” सोशल मीडियावर 'त्या' फोटोने घातला धुमाकूळ

Chris Gayle

Chris Gayle

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अखेरच्या सामन्यात वेस्ट इंडिजचा (West Indies vs Australia) 8 विकेटने पराभव झाला. दरम्यान मैदानावरील एक मजेशीर किस्सा सध्या व्हायरल होत आहे.

नवी दिल्ली, 7 नोव्हेंबर: क्रिकेट जगतात टी20 वर्ल्ड कपमधील (T20 World Cup 2021) वेस्ट इंडिजचं (West Indies) आव्हान संपुष्टात आल्यानंतर आक्रमक बॅटर ख्रिस गेल (Chris Gayle) च्या निवृत्तीच्या चर्चेने उधाण आले होते. अशातच ऑस्ट्रेलियासोबत झालेल्या अखेरच्या सामन्यातील गेलच्या एका फोटोने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकुळ घातला आहे.

टी20 वर्ल्ड कपमधील (T20 World Cup 2021) वेस्ट इंडिजचं (West Indies) आव्हान संपुष्टात आलं आहे. शनिवारी झालेल्या शेवटच्या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियानं (Australia vs West Indies) त्यांचा 8 विकेट्सनं पराभव केला. दरम्यान या सामन्यात एक मजेशीर घटना घडली.

ख्रिस गेलनं ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर डेविड वॉर्नरचीच मस्करी केली. वॉर्नर मैदानावर फलंदाजी करत असताना गेलने थेट त्याच्या खिशात हात घातला आणि काही क्षणात हा फोटो व्हायरल झाला. यावेळी नेटकऱ्यांनी गेल वॉर्नरच्या खिशात सँड पेपर तपासत आहे का? असा सवाल उपस्थित करायला सुरुवात केली.

इंग्लंड क्रिकेट संघाच्या फॅन क्लबने देखील हा फोटो ट्वीट करत वॉर्नरला खोचक टोला लगावला. त्यांनी हा फोटो पोस्ट करत म्हटलं, “ख्रिस गेल वॉर्नरच्या खिशात सँड पेपर आहे की नाही हे तपासत आहे का?” असं म्हणत इंग्लड क्रिकेट चाहत्यांनी एशेस मालिकेच्या आधी वॉर्नरवर निशाणा साधलाय. 2018 मध्ये वॉर्नरवर बॉल टेंपरिंगचे गंभीर आरोप झाले होते. त्यावरूनच इंग्लंड क्रिकेट फॅन क्लबने हे ट्वीट केलं.

ख्रिस गेलनं या सामन्यात षटकार ठोकत १५ धावा केल्या. या सामन्यात गेलनं गोलंदाजी केली आणि एक विकेटही घेतली.

First published:

Tags: Chris gayle, David warner, T20 cricket, T20 league, T20 world cup