मुंबई, 25 फेब्रुवारी : दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या महिला टी 20 वर्ल्ड कपमध्ये गुरुवारी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला सेमी फायनल सामना पारपडला. या सामन्यात भारतीय संघाचा 5 धावांनी पराभव झाला असून यामुळे भारताचे महिला टी 20 वर्ल्ड कपवर नाव कोरण्याचे स्वप्न अधुरे राहिले. या सामन्यात भारताच्या महिला खेळाडूंनी अखेर पर्यंत झुंज दिली. परंतु शेवटी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. सेमी फायनल मधील पराभवानंतर भारतीय संघाला सर्वांकडून सहानभूती मिळत आहे. परंतु अशातच भारतीय महिला संघाच्या माजी कर्णधार डायना एडुल्जी यांनी मात्र महिला संघाची कान उघडणी केली आहे. डायना यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत महिला संघाला झापलं. त्या म्हणाल्या, ‘बीसीसीआयने खेळाडूंच्या फिटनेसकडे गांभिऱ्याने लक्ष देणं गरजेचं आहे. मला माहिती आहे की यो-यो टेस्ट ही महिलांसाठी खूप कठिण असेल, 15 ते 12 खेळाडू याचाचणी फेलच होतील. परंतु याकरता काही वेगळे निकष लावण्याची आवश्यकता आहे. कारण सध्या महिला संघाच्या फिटनेसबाबत कोणतीच जबाबदारी निश्चित नाही’. केएल राहुलनंतर भारताचा अजून एक स्टार क्रिकेटर अडकणार लग्नबंधनात क्रिकेटर्सच्या फिटनेसबाबत त्या म्हणाल्या, ‘मला भारताच्या वरिष्ठ महिला संघापेक्षा भारताच्या अंडर १९ संघातील मुली अधिक फिट वाटल्या. कदाचित यामुळेच त्या फायनलपर्यंत गेल्या आणि जिंकल्या देखील. परंतु महिलांचा वरिष्ठ संघ 2017 ते 2023 तोच कित्ता गिरवत आहेत. तुम्ही वर्ल्डकपमध्ये आपलं नक्की काय चुकलं याची संपूर्ण चौकशी करा. संघाला फिटनेसवर पहिल्यांदा काम करायला हवे. फिल्डिंग, कॅचेस, रनिंग बिटवीन द विकेट्स या गोष्टी सुधारायला हव्यात. तुमचे पाय प्रॅक्टिक करून मजबूत होत नाहीत तोपर्यंत या मोठ्या टुर्नामेंटमध्ये विजय मिळवता येणार नाही’. विराट कोहलीने पुन्हा MS Dhoni बद्दल केलं मोठं वक्तव्य आता बीसीसीआयने हातात दांडक घेतलं पाहिजे : मुलाखतीत माजी कर्णधार डायना एडुल्जी कडक शब्दात म्हणाल्या, ‘महिलांच्या वरिष्ठ संघासाठी आता बीसीसीआयने हातात दंडकच घेतलं पाहिजे. त्याशिवाय त्या अव्वल स्थानावर पोहचणार नाहीत. बीसीसीआयकडून तुम्हाला सर्व काही मिळत आहे. परंतु तुम्ही नेहमी जिंकलेला सामना हरता. आता तर ही सवय होत चालली आहे. बीसीसीआयने अजून वेळ न घालवता कडक निर्णय घेतले पाहिजेत आणि आता त्यांचे लाड पुरवले जाऊ नयेत’.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.