चंद्रपूर, 25 जानेवारी : टीम इंडियाचा (Team India) माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) पुन्हा एकदा आयपीएल स्पर्धेत (IPL 2021) चेन्नई सुपर किंग्सची (CSK) कॅप्टनसी करणार आहे. पण आयपीएलपूर्वी तो शेतात काम करताना दिसून आला. याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. दरम्यान मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा एक फोटोही समोर आला आहे. माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर कुटुंबासह ताडोबा दाखल झाल्याचे वृत्त समोर आले आहे. आज तो ताडोब्यात जंगल सफारी करण्यासाठी गेला आहे. 25 ते 28 जानेवारीपर्यंत तो ताडोबात टायगर सफारी करणार आहे. आज दुपारच्या सफारीमध्ये सचिन तेंडुलकर अलीझंझा बफर झोन मध्ये दाखल झाल्याचे वृत्त समोर आलं आहे. हे ही वाचा-
MS Dhoni New Look : एमएस धोनीने पुन्हा बदलला लूक, पाहा Photo
दरम्यान टीम इंडियाचा (Team India) माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) पुन्हा एकदा आयपीएल स्पर्धेत (IPL 2021) चेन्नई सुपर किंग्सची (CSK) कॅप्टनसी करणार आहे. पण आयपीएलपूर्वी तो क्रिकेट प्रॅक्टीसमध्ये नाही तर अन्य कामांमध्ये व्यस्त आहे. इंटरनॅशनल क्रिकेटला रामराम केल्यानंतर धोनी आता ऑरगॅनिक शेतीकडे (Organic Farming) वळला आहे. लवकरच या क्षेत्रातही नवी भरारी घेण्याची धोनीची योजना आहे. महेंद्रसिंह धोनीचं रांचीमध्ये 43 एकर फार्म हाऊस आहे. गेल्या वर्षी 15 ऑगस्ट रोजी धोनी रिटायर झाला. त्यानंतर त्याने या फार्म हाऊसमधील शेतीमध्ये स्वत:ला वाहून दिलं आहे. या ठिकाणी तो स्ट्रॉबेरी, टोमॅटो, कोबी, पपई याची शेती करतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.