मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

MS Dhoni New Look : एमएस धोनीने पुन्हा बदलला लूक, पाहा Photo

MS Dhoni New Look : एमएस धोनीने पुन्हा बदलला लूक, पाहा Photo

कोरोना व्हायरसमुळे युएईमध्ये झालेल्या आयपीएल (IPL 2020) नंतर एमएस धोनी (MS Dhoni) क्रिकेटपासून लांब आहे. काहीच दिवसांपूर्वी धोनीला मुंबईमध्ये पाहण्यात आलं. या फोटोंमध्ये धोनीचा नवा लूक (New Look) समोर आला आहे.

  • Published by:  Shreyas
मुंबई, 25 जानेवारी : कोरोना व्हायरसमुळे युएईमध्ये झालेल्या आयपीएल (IPL 2020) नंतर एमएस धोनी (MS Dhoni) क्रिकेटपासून लांब आहे. काहीच दिवसांपूर्वी धोनीला मुंबईमध्ये पाहण्यात आलं. एका जाहिरातीच्या शूटिंगसाठी तो मायानगरीमध्ये आला होता. धोनीचे फोटो काढण्याची एकही संधी न सोडणाऱ्या त्याच्या चाहत्यांनी यावेळीही त्याचे फोटो काढले आणि लगेचच सोशल मीडियावर पोस्ट केले. यानंतर काही वेळातच हे फोटो व्हायरलही झाले. या फोटोंमध्ये धोनीचा नवा लूक समोर आला आहे. एमएस धोनीने त्याची पांढरी दाढी काढून टाकली आहे, तसंच हेयरस्टाईलही बदलली आहे. मागच्या एका वर्षात धोनीने बऱ्याच वेळा त्याचा लूक बदलला आहे. लॉकडाऊनच्या काळात धोनी पांढऱ्या दाढीमध्ये दिसला होता, त्यावेळी त्याला ओळखणंही कठीण झालं होतं. यानंतर आयपीएल 2020 मध्येही त्याने हेयरस्टाईल बदलली. आता नव्या वर्षातही धोनी नव्या रूपात त्याच्या चाहत्यांसमोर आला आहे. मागच्या वर्षी 15 ऑगस्टला धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. यानंतर आयपीएल 2020 मध्ये धोनी दिसला, आता पुन्हा एकदा आयपीएलच्या 2021 (IPL 2021) च्या मोसमात मैदानात दिसेल. त्याआधी धोनी आणि चेन्नईच्या टीमने काही कठोर निर्णय घेतले आहेत. सुरेश रैना याचं चेन्नईच्या टीममध्ये पुनरागमन झालं आहे, तर केदार जाधव, हरभजन सिंग, शेन वॉटसन, मोनू सिंग, पियुष चावला आणि मुरली विजय या सहा खेळाडूंना चेन्नईने बाहेर केलं आहे. आयपीएलच्या मागच्या मोसमात चेन्नईची कामगिरी निराशाजनक झाली. आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच चेन्नईला प्ले-ऑफ गाठता आली नाही. आता 18 फेब्रुवारीला आयपीएलसाठीचा लिलाव होणार आहे.
First published:

पुढील बातम्या