चेन्नई, 21 नोव्हेंबर: सीएसकेनं आयपीएल (IPL2021 WIN CSK) जिंकल्याबद्दल त्या यशाचं सेलिब्रेशन करण्यासाठी एक खास कार्यक्रम शनिवारी चेन्नईत झाला. यावेळी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन (MK Stalin) यांच्यासह अन्य मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. दरम्यान, मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी शनिवारी महेंद्रसिंह धोनीला(MS Dhoni) विशेष संदेश देऊन चेन्नई सुपर किंग्ज (CSK) च्या चाहत्यांची मने जिंकली. या समारंभात बोलताना एमके स्टॅलिन म्हणाले, “प्रिय महेंद्रसिंह धोनी, तू अनेक सीझनसाठी चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व करावे अशी आमची इच्छा आहे. धोनी तू झारखंडचा आहेस पण आमच्यासाठी, तामिळनाडूच्या लोकांसाठी तू आमच्यापैकी एक आहेस”. मी येथे तामिळनाडूचा मुख्यमंत्री म्हणून नाही तर धोनीचा चाहता म्हणून आलो आहे. केवळ मीच नाही तर येथे उपस्थित असलेली माझी नातवंडेही त्याचे चाहते आहेत. माझ्या दिवंगत वडिलही धोनीचे चाहते होते. मी धोनीला आवाहन करतो की, आता निवृत्तीचा विचार करू नका कारण आम्हाला त्याला पुढील अनेक वर्षे चेन्नईच्या कर्णधारपदी पहायचे आहे. अशी भावना व्यक्त करत स्टॅलिन यांनी धोनीला चेन्नईच्या कर्णधारपदी कायम राहण्याचे आवाहन केले आहे. या कार्यक्रमात, स्टॅलिन यांच्यासह बीसीसीआयचे (BCCI) सचिव जय शाह (Jay Shah), एन श्रीनिवासन, कपिल देव आणि अन्य खेळाडूंनी सहभाग दर्शवला होता.
You may be from the state of jarkhand but we consider you as one among us
— MS Dhoni (@maaanniiiiiii) November 20, 2021
- CM @mkstalin pic.twitter.com/hv274mT8Xv
भविष्याबाबत धोनी म्हणाला…
आयपीएल 2021 चे विजेतेपद जिंकणारा चेन्नई सुपर किंग्स (CSK) कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या भविष्याबाबत अद्याप काहीही ठरलेले नाही. धोनी किती दिवस आयपीएलमध्ये खेळणार याबाबत कोणालाच माहिती नाही. मात्र, धोनीने या झालेल्या समारंभात त्याच्या खेळाबद्दल मोठी प्रतिक्रिया दिली आहे. महेंद्रसिंह धोनीने आपला शेवटचा टी-२० सामना चेन्नईत होणार असल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे. त्यामुळे हा अनुभवी खेळाडू पुढील मोसमातही चेन्नईकडून खेळताना दिसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.