मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /David Warner ने केवळ 2 शब्दात सनरायझर्स हैदराबाद मधून बाहेर पडण्याचे दिले संकेत

David Warner ने केवळ 2 शब्दात सनरायझर्स हैदराबाद मधून बाहेर पडण्याचे दिले संकेत

David Warner

David Warner

ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरने (David Warner) इंस्टाग्रामवर एका चाहत्याला प्रत्युत्तर देत सनरायझर्स हैदराबादमधून बाहेर पडण्याचे जोरदार संकेत दिले आहेत.

नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर: ऑस्ट्रेलियाचा खेळाडू डेव्हिड वॉर्नरसाठी (David Warner ) यंदाचा आयपीएल हंगाम खूप खराब ठरला. इंडियन प्रीमियर लीग (IPL 2022) च्या 15 व्या हंगामात सनरायझर्स हैदराबाद (SRH) च्या कर्णधारपदावरून त्याची हकालपट्टी करण्यात आली. इतकेच नव्हे तर त्याला प्लेइंग इलेवनमधूनही वगळण्यात आले होते. आता क्रिकेट जगतामध्ये आगामी आयपीएल हंगामात वॉर्नर कोणत्या संघाकडून मैदानात उतरणार अशी चर्चा सुरु असतानाच एका चाहत्याने एसआरएच संघाकडे त्याला रिटेन करण्याची मागणी केली आहे. मात्र, वॉर्नर संघावर नाराज असल्याचे पाहायला मिळाले. त्याने केवळ दोन शब्दात आपले मत व्यक्त करत चाहत्याला उत्तर दिले आहे.

आयपीएलच्या(IPL2022) आगामी हंगामामध्ये मोठे बदल पाहायला मिळणार आहेत. आता पुढील वर्षासाठी मेगा ऑक्शन (ipl mega auction 2022) होणार असून अनेक स्टार खेळाडू वेगळ्या संघांकडून खेळताना पाहायला मिळणार आहेत. अशातच, वॉर्नरला एसआरएच संघ रिटेन करेला का? असा सवाल उपस्थित होत आहे.

दरम्यान, एका चाहत्याने संघाच्या फॅन पेजवर "टॉम मूडी हेड कोच, वॉर्नर कॅप्टन." असे म्हटले आहे. वॉर्नरने या टिप्पणीची दखल घेतली आणि चाहत्यांच्या अपेक्षा धुडकावून लावत 'नाही धन्यवाद' असे उत्तर दिले.

ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूने इंस्टाग्रामवर एका चाहत्याला प्रत्युत्तर देऊन सनरायझर्स हैदराबादमधून बाहेर पडण्याचे जोरदार संकेत दिले आहेत.

डेव्हिड वॉर्नर सनरायझर्स हैदराबाद सोडणार हे स्पष्ट झाले असले तरी त्यानंतर तो कोणत्या संघात खेळणार हे अद्याप निश्चित झालेले नाही. ऑस्ट्रेलियन सलामीवीर मेगा लिलावात जाण्याची शक्यता आहे, परंतु दोन नवीन संघांपैकी एकाने त्याला लिलावपूर्व निवड म्हणून विकत घेण्याची शक्यता देखील जास्त आहे.

वॉर्नरने सनरायझर्स हैदराबादला 2016 मध्ये आयपीएलचे एकमेव विजेतेपद मिळवून दिले. हैदराबादस्थित फ्रेंचायझीचे प्रतिनिधित्व करताना त्याने तीनदा ऑरेंज कॅप जिंकली आहे. यंदाच्या आयपीएल 2021 मध्ये, त्याने केवळ आठ सामन्यांत 24.37 च्या सरासरीने 195 धावा केल्या.

वॉर्नरने 2021 च्या T20 विश्वचषकात स्फोटक सर्वोत्तम कामगिरी केली आणि ऑस्ट्रेलियाला प्रथमच ट्रॉफी जिंकण्यात मदत केली. 146.70 च्या स्ट्राईक रेटने सात सामन्यांमध्ये 289 धावा केल्याबद्दल त्याला 'मॅन ऑफ द टूर्नामेंट' म्हणून गौरविण्यात आले.

First published:

Tags: David warner, IPL 2021, Ipl 2022 auction, SRH