मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /CWG 2022: वडिलांचं अधुरं स्वप्न मुलाकडून पूर्ण; 'या' एका गोष्टीमुळे जेरेमी वळला वेटलिफ्टींगकडे

CWG 2022: वडिलांचं अधुरं स्वप्न मुलाकडून पूर्ण; 'या' एका गोष्टीमुळे जेरेमी वळला वेटलिफ्टींगकडे

CWG 2022: भारताचा वेटलिफ्टर जेरेमी लालरिनुंगा याने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील 67 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले. जेरेमीचे वडील बॉक्सर होते. त्यांना पाहून जेरेमीने बॉक्सिंगला सुरुवात केली. पण, गावात वेटलिफ्टिंग अकादमी सुरू झाल्यानंतर त्याचा या खेळाकडे कल वाढला.

CWG 2022: भारताचा वेटलिफ्टर जेरेमी लालरिनुंगा याने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील 67 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले. जेरेमीचे वडील बॉक्सर होते. त्यांना पाहून जेरेमीने बॉक्सिंगला सुरुवात केली. पण, गावात वेटलिफ्टिंग अकादमी सुरू झाल्यानंतर त्याचा या खेळाकडे कल वाढला.

CWG 2022: भारताचा वेटलिफ्टर जेरेमी लालरिनुंगा याने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील 67 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले. जेरेमीचे वडील बॉक्सर होते. त्यांना पाहून जेरेमीने बॉक्सिंगला सुरुवात केली. पण, गावात वेटलिफ्टिंग अकादमी सुरू झाल्यानंतर त्याचा या खेळाकडे कल वाढला.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 31 जुलै : कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारतासाठी वेटलिफ्टर्स अप्रतिम कामगिरी करत आहेत. दुसऱ्या दिवशी चार पदकांनंतर आज 19 वर्षीय मिझोरमचा वेटलिफ्टर जेरेमी लालरिनुंगाने तिसर्‍या दिवशी 67 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले. जेरेमीने स्नॅचची सुरुवात 136 किलो वजनाने केली आणि पहिल्याच प्रयत्नात हे वजन उचलले. दुसऱ्या प्रयत्नात त्याने 140 किलो वजन उचलले. हा कॉमनवेल्थ गेम्सचा विक्रम आहे. जेरेमीने तिसऱ्या प्रयत्नात 143 किलो वजन उचलण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात त्याला यश मिळू शकले नाही. मात्र, त्याला सुवर्णपदक जिंकण्यात यश आले. गेल्या वर्षी राष्ट्रकुल चॅम्पियनशिपमध्ये त्याने स्नॅचमध्ये 141 किलो वजन उचलले होते. या स्पर्धेतही त्याने 305 (141+164 किलो) किलो वजन उचलून सुवर्णपदक जिंकले.

जेरेमीचा जन्म आयझॉल येथे झाला. खेळ त्याच्या रक्तात आहे, कारण त्याचे वडील बॉक्सिंगमध्ये ज्युनियर नॅशनल चॅम्पियन राहिले आहेत. जेरेमी आणि त्याचे चार भाऊ त्यांच्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून खेळात उतरले. जेरेमीनेही बॉक्सिंगपासून सुरुवात केली. पण, नंतर वेटलिफ्टिंगकडे कल वाढला. याचं कारणही त्याने एका मुलाखतीत सांगितलं. जेरेमी म्हणाला होता, माझ्या गावात एक अकादमी आहे, जिथे प्रशिक्षक वेटलिफ्टिंगचे प्रशिक्षण देतात. जेव्हा मी माझ्या मित्रांना वेटलिफ्टिंग करताना पाहिले तेव्हा मला वाटले की हा स्टॅमिनाचा खेळ आहे, मलाही त्यात उतरलं पाहिजे.

जेरेमीचे वडील बॉक्सर होते

जेरेमीच्या वडिलांचे भारतासाठी बॉक्सिंगचे स्वप्न अधुरेच राहिले. त्यांनी दोनदा भारताकडून खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते यशस्वी होऊ शकले नाही. पण, जेरेमीने केवळ वडिलांचे स्वप्न पूर्ण केले नाही. तर युवा ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकल्यानंतर आता राष्ट्रकुल स्पर्धेत पदक जिंकून त्याने वडिलांना अभिमान वाटावा अशी कामगिरी केली आहे.

CWG 2022: जेरेमी लालरिनुंगाची 'वजनदार' कामगिरी; अवघ्या 19व्या वर्षी सुवर्ण पदक मिळवत विक्रम

युवा ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकणारा पहिला भारतीय

2011 मध्ये आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटच्या चाचणीमध्ये जेरेमीची निवड झाली तेव्हा त्याच्या कारकिर्दीत एक मोठे वळण आले. येथूनच तो व्यावसायिक वेटलिफ्टर बनू लागला. यानंतर 2016 मध्ये जागतिक युवा चॅम्पियनशिपमध्ये 56 किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकले. 2017 च्या जागतिक ज्युनियर चॅम्पियनशिपमध्ये आणखी एक रौप्य पदक जिंकले. 2018 हे वर्ष त्याच्यासाठी संस्मरणीय ठरले. ज्युनियर आशियाई चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकले. तसेच अर्जेंटिना येथे झालेल्या युवा ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. त्याने 62 किलो वजनी गटात एकूण 274 किलो (124 किलो + 150 किलो) वजन उचलून सुवर्णपदक जिंकले. युवा ऑलिम्पिकच्या इतिहासात सुवर्णपदक जिंकणारा तो पहिला वेटलिफ्टर ठरला.

रोनाल्डो त्याचा आवडता खेळाडू

जेरेमीला वेटलिफ्टिंगशिवाय फुटबॉल आवडतो आणि रोनाल्डो हा त्याचा आवडता खेळाडू आहे. तो रोनाल्डोकडे एक आदर्श म्हणून पाहतो. कारण पैसा आणि प्रसिद्धी असूनही, रोनाल्डो अजूनही खेळाला आपले 100 टक्के देण्यासाठी कठोर परिश्रम करतो. हीच गोष्ट त्याला रोनाल्डोबद्दल प्रेरणा देते.

First published:

Tags: Weight lifting