मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2023 : मुंबई इंडियन्स फायनलला येऊ नये; CSKच्या गोलंदाजी प्रशिक्षकाला वाटते भीती

IPL 2023 : मुंबई इंडियन्स फायनलला येऊ नये; CSKच्या गोलंदाजी प्रशिक्षकाला वाटते भीती

चेन्नईच्या गोलंदाजी प्रशिक्षकाला वाटते मुंबई इंडियन्सची भीती

चेन्नईच्या गोलंदाजी प्रशिक्षकाला वाटते मुंबई इंडियन्सची भीती

आयपीएल फायनलचा इतिहास पाहिला तर चेन्नई सुपर किंग्जची मुंबई इंडियन्सविरुद्धची कामगिरी खराब आहे. फायनलमध्ये आतापर्यंत चार वेळा दोन्ही संघ आमने सामने आले आहेत.

मुंबई, 25 मे : आयपीएल 2023च्या फायनलमध्ये चेन्नई सुपर किंग्जने धडक मारली आहे. तर आता फायनलमध्ये पोहोचण्यासाठी मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात लढत होणार आहे. दरम्यान, त्याआधी चेन्नई सुपर किंग्जचा गोलंदाजी प्रशिक्षक ड्वेन ब्राव्होने म्हटलं की, "फायनलमध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळायचं नाही." गुजरात टायटन्सविरुद्ध क्वालिफायर एकमध्ये 15 धावांनी विजय मिळवल्यानतंर एका मुलाखतीत ब्राव्होने म्हटलं की, "मला मुंबई इंडियन्सची भीती वाटते आणि मला व्यक्तिगत वाटतं की आमची फायनलमध्ये मुंबईशी गाठ पडू नये."

क्वालिफायर दोनमध्ये मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात 26 मे रोजी सामना होणार आहे. या दोन्हींपैकी जो संघ जिंकेल तो चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध फायनलमध्ये खेळणार आहे. मात्र आता ड्वेन ब्राव्होला मुंबई इंडियन्स फायनलमध्ये पोहोचण्याची भीती वाटू लागली आहे.

ड्वेन ब्राव्हो म्हणाला की, खरं सांगू तर मला मनापासून नाही वाटत की मुंबई इंडियन्स फायनलमध्ये पोहोचावी. माझा मित्र पोलार्डला याबद्दल माहिती आहे. गंमतीची गोष्ट बाजूला ठेवली तर मी सर्व संघांना बेस्ट ऑफ लक देतो. आमची नजर यावरच असेल की कोण फायनलमध्ये पोहोचणार.

माझंच चुकलं, लखनऊचा कर्णधार कृणाल पांड्याने सांगितलं पराभवाचं कारण 

आयपीएल फायनलचा इतिहास पाहिला तर चेन्नई सुपर किंग्जची मुंबई इंडियन्सविरुद्धची कामगिरी खराब आहे. आयपीएलच्या फायनलमध्ये आतापर्यंत चार वेळा दोन्ही संघ आमने सामने आले आहेत. त्यात चार पैकी तीन वेळा मुंबईने बाजी मारली आहे. चेन्नईने 2010 मध्ये एकदाच मुंबईला हरवलं होतं. त्यानंतर 2013, 2015 आणि 2019 मध्ये मुंबईने चेन्नईला हरवून विजेतेपद पटकावलं होतं.

एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सने लखनऊ सुपर जायंट्सवर दणदणीत विजय मिळवला. मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना 183 धावा केल्या होत्या. तर प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या लखनऊ सुपर जायंट्सचा डाव 101 धावातच गुंडाळला. मुंबईने फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात कमाल करत सामना जिंकला.

First published:
top videos

    Tags: IPL 2023