मुंबई, 26 डिसेंबर : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (Australia vs England) यांच्यात सुरू असलेल्या अॅशेस सीरिजमधील तिसऱ्या टेस्टचा (Ashes Series) आज (रविवार) पहिला दिवस आहे. मेलबर्नमध्ये सुरू असलेल्या या बॉक्सिंग डे टेस्टमध्ये (Boxing Day Test) इंग्लंडची सुरूवात खराब झाली आहे. ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन पॅट कमिन्सनं (Pat Cummins) पहिल्या सेशनमध्ये इंग्लिश टीमला जोरदार हादरे दिले आहेत. फास्ट बॉलिंगला मदत करणाऱ्या एमसीजीच्या (MCG Ground) पिचवर ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन पॅट कमिन्सनं टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटींग करण्याचा निर्णय दिला. कोरोनाग्रस्त व्यक्तीच्या संपर्कात आल्यानं दुसरी टेस्ट खेळू न शकलेल्या कमिन्सनं भेदक बॉलिंग केली. इंग्लंडचा ओपनर हसीब हमीद शून्यावर आऊट झाला. या सीरिजमध्ये पहिल्यांदाच खेळणाऱ्या झॅक क्राऊलीला कमिन्सनं 12 रनवर आऊट केले. त्यानंतर जो रूट (Joe Root) आणि डेव्हिड मलान (David Malan) यांनी इंग्लंडची इनिंग सावरण्याचा प्रयत्न केला. ही जोडी स्थिरावली आहे, असं वाटत असतानाच कमिन्सनं लंचपूर्वी मलानला आऊट करत इंग्लंडला मोठा धक्का दिला. इंग्लंडनं पहिल्या दिवशी लंचपर्यंत 3 आऊट 61 रन केले असून ऑस्ट्रेलियाकडून कॅप्टन कमिन्सनं तीन्ही विकेट्स घेतल्या आहेत.
This one carries!
— cricket.com.au (@cricketcomau) December 26, 2021
Cummins gets his THIRD wicket of the morning right as lunch is due #Ashes pic.twitter.com/AVBTRVdrHq
England head to Lunch at 61/3 on Day 1 of the Boxing Test.
— ICC (@ICC) December 26, 2021
Pat Cummins has dismissed all three batters.
Watch the #Ashes live on https://t.co/CPDKNx77KV (in select regions) 📺#AUSvENG | #WTC23 | https://t.co/QKpJv6yy6n pic.twitter.com/etHkz2LVuJ
पाच टेस्टच्या अॅशेस सीरिजमध्ये इंग्लंडची टीम सध्या 0-2 ने पिछाडीवर आहे. ही सीरिज वाचवण्यासाठी इंग्लंडला आता एकही टेस्ट गमावून चालणार नाही. अॅडलेड टेस्टमध्ये 275 रननं पराभव झाल्यानंतर इंग्लंड टीमनं या टेस्टसाठी टीममध्ये चार बदल केले आहेत. झॅक क्राऊली, जॉनी बेअरस्टो, मार्क वूड आणि जॅक लीच यांचा टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. तर ऑस्ट्रेलिया टीमनंही या टेस्टसाठी दोन बदल केले आहेत. IND vs SA ODI Series : टीम इंडियात 4 वर्षांनी होणार स्टार खेळाडूचं पुनरागमन!

)







