मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /लग्न एक मॅच, मला या फिल्डचा अंदाज नव्हता; घटस्फोटावर धवनने सोडलं मौन

लग्न एक मॅच, मला या फिल्डचा अंदाज नव्हता; घटस्फोटावर धवनने सोडलं मौन

शिखर धवनने २०१२ मध्ये आयशा मुखर्जीसोबत लग्न केलं होतं. आयशाचं हे दुसरं लग्न होतं. शिखर धवन आणि आयशा यांनी २०२१ मध्ये घटस्फोटाचा निर्णय घेतला.

शिखर धवनने २०१२ मध्ये आयशा मुखर्जीसोबत लग्न केलं होतं. आयशाचं हे दुसरं लग्न होतं. शिखर धवन आणि आयशा यांनी २०२१ मध्ये घटस्फोटाचा निर्णय घेतला.

शिखर धवनने २०१२ मध्ये आयशा मुखर्जीसोबत लग्न केलं होतं. आयशाचं हे दुसरं लग्न होतं. शिखर धवन आणि आयशा यांनी २०२१ मध्ये घटस्फोटाचा निर्णय घेतला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

दिल्ली, 26 मार्च : भारताचा क्रिकेटपटू शिखर धवन त्याच्या बिनधास्त स्वभावासाठी ओळखला जातो. क्रिकेटच्या मैदानाप्रमाणेच त्याच्या आयुष्यातही अनेक चढउतार दिसून आले आहेत. सध्या क्रिकेट आणि आयुष्य दोन्हीत अडचणींचा सामना धवन करत आहे. शिखर धवन आणि त्याची पत्नी आयशा मुखर्जी यांच्यात घटस्फोट होणार आहे. याबाबत शिखर धवनने मौन सोडलं आहे. धवनने म्हटलं की, मला दुसऱ्याकडे बोट दाखवणं आवडत नाही. या क्षेत्रात मी अपयशी ठरलो कारण यातला अनुभव नव्हता.

एका न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत शिखर धवनने घटस्फोटाबाबत खुलासा केला. तो म्हणाला एखादी व्यक्ती निर्णय घेते तेव्हा शेवटचा निर्णय त्याचा असतो आणि म्हणून मी अपय़शी ठरलो. मी इतरांकडे बोट दाखवणार नाही. मला या फिल्डचा अंदाज नव्हता. क्रिकेटबद्दल आज मी जे बोलतो ते २० वर्षांपूर्वी मला विचारलं असतं तर मला याबाबत माहिती नसतं. या अनुभवाच्या गोष्टी आहेत. सुरुवातीला एक - दोन वर्षे व्यक्तीसोबत घालवा आणि पाहा की संस्कार जुळतात की नाही.

World Championship : भारताचा दुसरा गोल्डन पंच, स्विटीने 9 वर्षांने पटकावले सुवर्णपदक 

धवनने म्हटलं की, हासुद्धा एक सामनाच होता. सध्या माझी घटस्फोटाची केस सुरू आहे. ती संपल्यानंतर जेव्हा मला लग्न करायचं असेल तेव्हा मी या फिल्डमध्ये जास्त समजूतदार असेन की मला कसा पार्टनर हवा. जर मला लग्न करायचं असेल तर मी ज्याच्यासोबत आयुष्य घालवू शकेन अशी व्यक्ती हवी. मी २६-२७ वर्षांचा होतो आणि खेळत होतो तेव्हा रिलेशनशिपमध्ये नव्हतो. मी प्रेमात पडलो तेव्हा रेड फ्लॅग्स पाहू शकलो नाही. पण आता प्रेमात पडेन तेव्हा रेड फ्लॅग्स पाहू शकेन. तसं काही वाटलं तर मी त्यातून बाहेर येईन.

धवनने म्हटलं की, लग्न माझ्यासाठी एक बाउन्सर होता आणि माझ्या डोक्याला तो लागला. चारी मुंड्या चित करून गेला. हरणेही गरजेचं आहे पण पराभव स्वीकारायला शिका. माझ्याकडून चूक झाली आणि माणूस चुकांमधूनच शिकतो.

शिखर धवनने २०१२ मध्ये आयशा मुखर्जीसोबत लग्न केलं होतं. आयशाचं हे दुसरं लग्न होतं. तर धवनसोबत लग्न झाल्यानंतर आयशाने २०१४ मध्ये एका मुलाला जन्म दिला. शिखर धवन आणि आयशा यांनी २०२१ मध्ये घटस्फोटाचा निर्णय घेतला. अद्याप दोघांची घटस्फोटाची केस न्यायालयात सुरू आहे.

First published:
top videos

    Tags: Cricket, Shikhar dhawan