• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • सलग 6 सिक्सनंतर मैदानात काय घडलं... युवराजनं केला खुलासा

सलग 6 सिक्सनंतर मैदानात काय घडलं... युवराजनं केला खुलासा

टीम इंडियाचा माजी ऑल राऊंडर युवराज सिंह (Yuvraj Singh) याने 2007 च्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये सलग 6 बॉलवर 6 लगावले होते. या खेळीनंतर धोनीची (MS Dhoni) काय प्रतिक्रिया होती याचं उत्तर युवराजनं दिलं आहे.

 • Share this:
  मुंबई, 12 जून : टीम इंडियाचा माजी ऑल राऊंडर युवराज सिंह (Yuvraj Singh) याने 2007 च्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये सलग 6 बॉलवर 6 लगावले होते. दक्षिण आफ्रिकेत झालेल्या पहिल्या टी20 वर्ल्ड कपमध्ये इंग्लंड विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये युवराजने ही कामगिरी केली होती. युवराजनं ही कामगिरी केली त्यावेळी टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) युवराजसोबत खेळत होता. दुसऱ्या बाजूने ही कामगिरी पाहत असलेल्या धोनीची काय प्रतिक्रिया होती. त्या सहा सिक्सनंतर मैदानात काय घडले, याचा खुलासा युवराजने केला आहे. फ्लिंटॉफशी झाला होता वाद इंग्लंड विरुद्ध झालेल्या त्या मॅचमधील 18 व्या ओव्हरमध्ये युवराज आणि इंग्लंडचा ऑल राऊंडर अँण्ड्रयू फ्लिंटॉफ याच्यात वाद झाला होता. गौरव कपुरच्या पॉडकॉस्ट शो मध्ये युवराजनं ही आठवण सांगितली आहे."मी फ्लिंटॉफला दोन फोर लगावले होते. फ्लिंटॉफला ते आवडलं नाही. तू इकडे ये मी तुझा गळा कापेन' अशी धमकी युवराजला फ्लिंटॉफने दिली होती. त्यानंतर या वादाचा राग युवराजने ब्रॉडवर पुढच्या ओव्हरमध्ये काढला. त्याने ब्रॉडला सलग सहा सिक्स लगावले. त्यानंतर मैदानात काय झाले... युवराजनं  सहा सिक्स लगावल्यानंतर मैदानात काय झाले हे सांगितले आहे. आपल्या कामगिरीवर धोनी खूप खुश होता. टीमचा कॅप्टन म्हणून तो खूप आनंदी झाला होता. आम्हाला तेव्हा वेगाने रन बनवण्याची गरज होती. तसेच ती मॅच जिंकणे आवश्यक होते,'' असे युवी म्हणाला. टीम इंडियात निवड होताच ऋतुराज गायकवाड भावुक, म्हणाला... कॅप्टन होईल वाटले होते पण... दक्षिण आफ्रिकेत 2007 साली झालेल्या  पहिल्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये आपल्याला कॅप्टन होण्याची अपेक्षा होती, पण महेंद्रसिंह धोनीचं  कॅप्टन म्हणून नाव जाहीर झालं, असं युवराजने सांगितले. "भारताचा त्यावर्षी झालेल्या 50 ओव्हर्सच्या वर्ल्ड कपमध्ये पराभव झाला होता. त्यामुळे टीम इंडियामध्ये बऱ्याच घटना घडत होत्या. इंग्लंड आणि आयर्लंडमध्ये या देशांचा दोन महिन्यांचा दौरा होता. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेत टी 20 वर्ल्ड कप होणार होता. त्यावेळी टीममधील सीनियर्सनी ब्रेक घेण्याचे ठरवले होते.कुणीही टी 20 वर्ल्ड कप गांभीर्याने घेतला नव्हता. मला मात्र त्यावेळी कॅप्टन होईल असे वाटले होते, पण धोनीच्या नावाची कॅप्टन म्हणून घोषणा झाली."  असे युवराजने यावेळी बोलताना स्पष्ट केले.
  Published by:News18 Desk
  First published: