दोन दिवसांपूर्वी निवृत्त झालेला युसुफ पठाण करणार क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन

दोन दिवसांपूर्वी निवृत्त झालेला युसुफ पठाण करणार क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन

युसुफ पठाण (Yusuf Pathan) यानं दोनच दिवसांपूर्वी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. आक्रमक खेळासाठी प्रसिद्ध असलेला युसुफ आता पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर फटकेबाजी करण्यासाठी सज्ज झाला आहे.

  • Share this:

मुंबई, 28 फेब्रुवारी : दोन क्रिकेट वर्ल्ड कप विजेत्या टीमचा सदस्य आणि माजी ऑलराऊंडर युसुफ पठाण (Yusuf Pathan)  यानं दोनच दिवसांपूर्वी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. आक्रमक खेळासाठी प्रसिद्ध असलेला युसुफ आता पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर फटकेबाजी करण्यासाठी सज्ज झाला आहे.

युसुफ पठाणसह नुकतीच क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करणारे नमन ओझा, विनय कुमार हे खेळाडू देखील रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये (Road Safety Series) सहभागी होणार आहेत. हे सर्व खेळाडू इंडिया लिजेंड्स या टीमचं प्रतिनिधित्व करणार आहेत.

50 रुपयांत पाहता येणार मॅच

छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये 2 मार्चपासून वर्ल्ड सेफ्टी रोड सीरिज (Road Safety World Series)  स्पर्धा सुरू होत आहे. या स्पर्धेत सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा (Brian Lara) यांच्यासह अनेक दिग्गज सहभागी होणार आहेत.

या सीरिजची सुरुवात मागच्या वर्षी झाली. पहिल्याच वर्षी ही स्पर्धा चांगलीच लोकप्रिय झाली. मात्र मागच्या वर्षी फक्त चार मॅचनंतर ही सीरिज कोरोनामुळे स्थगित करावी लागली होती. आता सीरिजमधील उर्वरित मॅच रायपूरमध्ये होणार आहेत.

(वाचा : भारताच्या आणखी एका ऑलराउंडरचा क्रिकेटला अलविदा! 2 वर्ल्डकप जिंकण्यात होती महत्त्वाची भूमिका )

या स्पर्धेच्या निमित्तानं सचिन, लारासह वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंह, झहीर खान, मुरलीधरन, चामिंडा वास, तिलकरत्ने दिलशान जॉन्टी ऱ्होडस, लान्स क्लुसनर यासारख्या दिग्गज खेळाडूंचा खेळ क्रिकेट फॅन्सना पुन्हा एकदा पाहता येणार आहे. 65 हजार क्षमतेच्या क्रिकेट मैदानात या लढती होणार आहेत. कोरोना निर्बंधामुळे फक्त 25 हजार प्रेक्षकांनाच मैदानात उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे

इंडिया लिजेंड्स टीम : सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंह, मोहम्मद कैफ, प्रज्ञान ओझा, नोएल डेव्हिड, मुनाफ पटेल, इरफान पठाण, मनप्रीत गोणी, युसुफ पठाण, नमन ओझा, एस. बद्रीनाथ आणि विनय कुमार

Published by: News18 Desk
First published: February 28, 2021, 12:35 PM IST

ताज्या बातम्या