जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / WTC Point Table: पाकिस्तानचा वेस्ट इंडिजवर विजय पण टीम इंडियाला झाला फायदा

WTC Point Table: पाकिस्तानचा वेस्ट इंडिजवर विजय पण टीम इंडियाला झाला फायदा

WTC Point Table: पाकिस्तानचा वेस्ट इंडिजवर विजय पण टीम इंडियाला झाला फायदा

पाकिस्ताननं दुसऱ्या टेस्टमध्ये वेस्ट इंडिजचा 109 रननं पराभव केल्यानं (Pakistan won by 109 runs against West Indies) टीम इंडियाला फायदा झाला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 25 ऑगस्ट:  पाकिस्ताननं दुसऱ्या टेस्टमध्ये वेस्ट इंडिजचा 109 रननं पराभव केल्यानं (Pakistan won by 109 runs against West Indies) टीम इंडियाला फायदा झाला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC Points Table)  पॉईंट टेबलमध्ये टीम इंडिया टॉपवर पोहचली आहे. तर पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजच्या टीम दुसऱ्या नंबरवर आहेत. तर इंग्लंडची टीम चौथ्या क्रमांकावर आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या सिझनममध्ये भारत, पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजनं प्रत्येकी एक टेस्ट जिंकली आहे. भारताचे सध्या 2 टेस्टनंतर 58.33 टक्के तर पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजचे 50 टक्के पॉईंट्स आहेत. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिली टेस्ट ड्रॉ झाल्यानंतर दोन्ही टीमला 4-4 पॉईंट्स मिळाले होते. पण स्लो ओव्हर रेटमुळे आयसीसनं प्रत्येकी 2 पॉईंट्स कट केले होते. लॉर्ड्स टेस्ट जिंकल्यानं भारताला बारा पॉईंट्स मिळाले आहेत. काय आहे नवी पद्धत? WTC च्या नव्या पद्धतीनुसार टेस्ट मॅच जिंकणाऱ्या टीमला 100 टक्के, टाय झाल्यावर 50 टक्के तर ड्रॉ झाल्यानंतर 33.33 टक्के पॉईंट्स मिळणार आहेत. या पॉईंट्सच्या आधारावर टीमची रँकिंग निश्चित होणार आहे.

News18

राशिद खाननं 9 बॉलमध्ये काढले 27 रन, अगदी धोनीसारखा लगावला हेलिकॉप्टर शॉट VIDEO पाकिस्तान- वेस्ट इंडिजनं जिंकली 1 टेस्ट फास्ट बॉलर शाहिन आफ्रिदीच्या जोरदार कामगिरीमुळे पाकिस्ताननं दुसऱ्या टेस्टमध्ये वेल्ट इंडिजचा 109 रननं पराभव करत दोन टेस्टची सीरिज 1-1 नं बरोबरीत सोडवली. आफ्रिदीनं या मॅचमध्ये 10 विकेट्स घेतल्या. वेस्ट इंडिजला दुसऱ्या इनिंगमध्ये 329 रनचं लक्ष्य होतं. पण त्यांची टीम 219 रनवरचऑल आऊट झाली. या सीरिजमधील पहिली टेस्ट वेस्ट इंडिजनं जिंकली होती. दुसरीही टेस्ट त्यांनी जिंकली असती तर ती टीम नंबर 1 वर गेली असती. पण पाकिस्ताननं विजय मिळवल्यानं टीम इंडियाचा फायदा झाला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात