मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /WTC Final 2021: न्यूझीलंडला हरवण्यासाठी टीम इंडिया मैदानात, विराट कोहली म्हणाला...

WTC Final 2021: न्यूझीलंडला हरवण्यासाठी टीम इंडिया मैदानात, विराट कोहली म्हणाला...

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी (WTC Final 2021) टीम इंडियाच्या खेळाडूंनी ग्रुप ट्रेनिंग सुरु केले आहे. टीम इंडिया 3 जून रोजी इंग्लंडमध्ये दाखल झाली आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी (WTC Final 2021) टीम इंडियाच्या खेळाडूंनी ग्रुप ट्रेनिंग सुरु केले आहे. टीम इंडिया 3 जून रोजी इंग्लंडमध्ये दाखल झाली आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी (WTC Final 2021) टीम इंडियाच्या खेळाडूंनी ग्रुप ट्रेनिंग सुरु केले आहे. टीम इंडिया 3 जून रोजी इंग्लंडमध्ये दाखल झाली आहे.

साऊथम्पटन, 9 जून: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी (WTC Final 2021) टीम इंडियाच्या खेळाडूंनी ग्रुप ट्रेनिंग सुरु केले आहे. टीम इंडिया 3 जून रोजी इंग्लंडमध्ये दाखल झाली आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील फायनल मॅच 18 ते 22 जूनच्या दरम्यान साऊथम्पटनमध्ये होणार आहे. टीम इंडिया यापूर्वी आयसोलेशनमध्ये होती. आता खेळाडू छोट्या ग्रुपमध्ये प्रॅक्टिस करु शकतील. विराट कोहलीच्या (Virat Kohli) कॅप्टनसीमध्ये आयसीसी स्पर्धेचं पहिलं विजेतेपद जिंकण्याची टीम इंडियाला यंदा संधी आहे.

टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीनं शुभमन गिल (Shubman Gill) आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) यांच्यासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. 'सूर्य हास्य फुलवतो,' असे कॅप्शन त्याने या फोटोला दिले आहे. साऊथम्पटनमध्ये गेल्या काही दिवसांपासून पाऊस सुरू होता. भारत आणि न्यूझीलंडची टीम पहिल्यांदाच तटस्थ ठिकाणी टेस्ट मॅच खेळणार आहे.

शुभमन गिलनं ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेत चांगली कामगिरी केली होती. त्या कामगिरीच्या आधारावर त्याचा टीममध्ये समावेश होण्याची शक्यता आहे. इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत तो अपयशी ठरला होता. आता फायनलमध्ये संधी मिळाल्यास हे अपयश पुसण्याचा गिलचा प्रयत्न असेल. चेतेश्वर पुजारा हा टीम इंडियाच्या बॅटींगचा आधारस्तंभ आहे. मात्र त्याला बऱ्याच काळापासून शतक झळकवण्यात अपयश आले आहे.

View this post on Instagram

A post shared by Virat Kohli (@virat.kohli)

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी 23 जून हा रिझर्व दिवस आहे. पाच दिवसाचा खेळ पूर्ण झाला नाही तर या दिवशी खेळ होणार आहे. मात्र याबाबतचा अंतिम निर्णय मॅच रेफ्री घेतील. फायनल मॅच ड्रॉ किंवा टाय झाली तर दोन्ही टीमना संयुक्त विजेते म्हणून घोषित करण्यात येईल. आजवर फक्त 2002 साली भारत आणि श्रीलंका यांना चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत संयुक्त विजेते म्हणून घोषित करण्यात आले होते.

WTC फायनलमधील कॉमेंटेटर टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकून देण्यासाठी सज्ज

भारताचे पारडे जड

भारत आणि न्यूझीलंडमधील एकूण क्रिकेट रेकॉर्ड पाहिले तर टीम इंडियाचे पारडे जड आहे. दोन्ही देशात तीन्ही फॉरमॅटमध्ये मिळून 185 सामने झाले आहेत. यापैकी 82 सामने टीम इंडियाने जिंकले असून न्यूझीलंडने 69 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. दोन्ही देशात आजवर 59 टेस्ट झाल्या आहेत. यापैकी टीम इंडियाने 21 तर न्यूझीलंडने 12 टेस्ट जिंकल्या आहेत.

First published:
top videos

    Tags: Cricket, Instagram post, Virat kohli