मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /WTC फायनलमधील कॉमेंटेटर टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकून देण्यासाठी सज्ज, श्रीलंकेत जाण्याचीही तयारी

WTC फायनलमधील कॉमेंटेटर टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकून देण्यासाठी सज्ज, श्रीलंकेत जाण्याचीही तयारी

दिनेश कार्तिकचा (Dinesh Karthik) सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांच्यासोबत कॉमेंट्री पॅनलमध्ये समावेश करण्यात आला आहे. कार्तिक आता मॅचची कॉमेंट्री करणार असला तरी त्याचं अजुनही लक्ष्य टीम इंडियामध्ये पुनरागमन करणे हे आहे.

मुंबई, 10 जून : टीम इंडियातून बाहेर असलेला विकेटकिपर- बॅट्समन दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) लवकरच नव्या भूमिकेत दिसणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या फायनल दरम्यान (WTC Final 2021) कार्तिक कॉमेंट्री करणार आहे. कार्तिकचा सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांच्यासोबत कॉमेंट्री पॅनलमध्ये समावेश करण्यात आला आहे. कार्तिक आता मॅचची कॉमेंट्री करणार असला तरी त्याचं अजुनही लक्ष्य टीम इंडियामध्ये पुनरागमन करणे हे आहे.

दिनेश कार्तिकने 'स्पोर्ट्स कीडा' शी बोलताना सांगितले की, "आयपीएल किंवा देशांतर्गत क्रिकेटमधील T20 मॅचमधील माझी आकडेवारी पाहिली तर मला 100 टक्के टीम इंडियात जागा मिळायला हवी, असा माझा विश्वास आहे. अन्य गोष्टी या निवड समितीचे सदस्य काय विचार करतात यावर अवलंबून आहेत."

दिनेश कार्तिकने या मुलाखतीमध्ये पुढे  सांगितले की, "मी मिडल ऑर्डरमध्ये योगदान देऊ शकतो. भारतीय टीममध्ये अशा खेळाडूची गरज आहे.मी माझ्या खेळाचे उदाहरण यापूर्वी दिले आहे. मला माझे कौशल्य दाखवण्याची संधी मिळाली तर टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकण्याची चांगली संधी आहे."

टीम इंडिया पुढील महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यावर जाण्याची कार्तिकची तयारी आहे. श्रीलंकेत 2018 साली झालेल्या निदहास ट्रॉफी तिरंगी  मालिकेची फायनल कार्तिकने गाजवली होती. या स्पर्धेत बांगलादेश विरुद्ध झालेल्या फायनलमध्ये कार्तिकने 8 बॉलमध्ये नाबाद 29 रनची खेळी केली होती. कार्तिकने अगदी शेवटच्या बॉलवर सिक्स लगावत टीम इंडियाला विजेतेपद मिळवून दिले होते.

IPL 2021: KKR ची टीम संकटात, जुन्या Tweets मुळे दिग्गज अडचणीत

दिनेश कार्तिकनं 32 आंतरराष्ट्रीय टी 20 मॅचमध्ये 143.53 च्या सरासरीने 399 रन केले आहेत. 2019 साली झालेल्या क्रिकेट वर्ल्ड कपनंतर त्याला टीम इंडियामधून वगळण्यात आले होते. कार्तिक कोलकाता नाईट रायडर्स टीमचा सदस्य आहे. आयपीएल स्पर्धेच्या उर्वरित सामन्यांसाठी इयन मॉर्गन (Eoin Morgan) उपलब्ध नसल्यास कॅप्टनसी करण्याची तयारी कार्तिकने दाखवली आहे.

First published:
top videos

    Tags: Cricket news, India Vs Sri lanka