साऊथम्पटन, 17 जून : भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zeland) यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल (WTC Final 2021) शुक्रवारपासून साऊथम्पटनमध्ये सुरु होत आहे. या फायनलपूर्वी टीम इंडियाचा फास्ट बॉलर जसप्रीत बुमराहची (Jasprit Bumrah) मुलाखत त्याची पत्नी संजना गणेशननं (Sanjana Ganesan) घेतली आहे. या अनोख्या मुलाखतीमधून इन्स्टाग्राम फोटोंमधून संजनानं बुमराहाला आयुष्यातल्या महत्त्वाच्या टप्प्यांवर बोलतं केलं आहे. संजना ही टीव्ही अँकर आहे. लग्नानंतर पहिल्यांदाच बुमराहनं संजनाला मुलाखत दिली आहे. आयसीसीनं (ICC) त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ही मुलाखत शेअर केली आहे. आठवणींना उजाळा बुमराहनं या मुलाखतीमध्ये त्याच्या आयुष्यातील आठवणींना उजाळा दिला आहे. लहानपणी बहिणीबरोबर क्रिकेट खेळणे ते ऑस्ट्रेलियात या वर्षाच्या सुरुवातीला मालिका जिंकण्यापर्यंतच्या आठवणी बुमराहनं सांगितल्या आहेत. त्याचबरोबर लग्नाचा दिवस हा आयुष्यातील आजवरचा सर्वात चांगला दिवस असल्याचं तो यावेळी म्हणाला.
Playing with his sister, starring in school cricket and ‘the best day’ of his life.@SanjanaGanesan takes @Jaspritbumrah93 through some Insta Memories before the #WTC21 Final 🎥 pic.twitter.com/k8FKUxgQJI
— ICC (@ICC) June 17, 2021
कॅमेऱ्याला पाहू की तुला? संजनानं घेतलेली बुमराहची मुलाखत क्रिकेट फॅन्समध्ये चांगलीच व्हायरल झाली आहे. यावेळी बुमराहनं कॅमेऱ्याकडे पाहू की तुझ्याकडे असा एक खट्याळ प्रश्न संजनाला विचारला. त्यावर संजाननं कॅमेऱ्याकडे पाहा असं बुमराहला सांगितलं, पण त्यावेळी या दोघांनाही हसू आवरलं नाही. वन-डे क्रिकेटमधील सर्वात थरारक मॅचची तुमची आठवण काय? पाहा कधीही न विसरणारा VIDEO क्रिकेटमध्ये येण्यापूर्वी मी थोडा जाड होतो, त्यानंतर फिटनेसवर काम केले असं बुमराहनं या मुलाखतीमध्ये सांगितले.