मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

WTC Final: चौथ्या दिवशी क्रिकेटचा की पावसाचा खेळ? वाचा कसे आहे सोमवारचे हवामान

WTC Final: चौथ्या दिवशी क्रिकेटचा की पावसाचा खेळ? वाचा कसे आहे सोमवारचे हवामान

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलला (WTC Final 2021) इंग्लंडमधील खराब हवामानाचा फटका बसला आहे. पहिल्या दिवशी पावसामुळे टॉस देखील होऊ शकला नाही. नंतरचे दोन दिवस खराब प्रकाशामुळे खेळ लवकर थांबवावा लागला.

  • Published by:  News18 Desk

साऊथम्पटन, 21 जून: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलला (WTC Final 2021) इंग्लंडमधील खराब हवामानाचा फटका बसला आहे. पहिल्या दिवशी पावसामुळे टॉस देखील होऊ शकला नाही. नंतरचे दोन दिवस खराब प्रकाशामुळे खेळ लवकर थांबवावा लागला. या टेस्टमधील दुसऱ्या दिवसावर भारताचे तर तिसऱ्या दिवसावर न्यूझीलंडचे वर्चस्व होते. त्यामुळे आता चौथ्या दिवशी कोण सरस ठरतो यावर या चॅम्पियनशिपचं भवितव्य अवलंबून आहे.

इंग्लंडच्या हवामान विभागानं सोमवारचा व्यक्त केलेला अंदाज क्रिकेट फॅन्ससाठी निराशाजनक आहे. चौथ्या दिवशी देखील पावसाचं विघ्न कायम आहे. चौथ्या दिवसाचे पहिले आणि तिसरे सत्र पावसामुळे वाया जाऊ शकते. तर दुसऱ्या सत्रामध्ये देखील मैदानावर काळे ढग दाटलेले असतील.

साऊथम्पटन टेस्टमध्ये टीम इंडियाची पहिली इनिंग 217 रनवर संपुष्टात आली. त्याला उत्तर देताना न्यूझीलंडनं तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस 2 आऊट 101 रन काढले आहेत. केन विल्यमसन (Kane Williamson) आणि रॉस टेलर (Ross Taylor) ही न्यूझीलंडची अनुभवी जोडी मैदानात आहे. आता चौथ्या दिवशी या दोघांच्या खेळात पावसाचा अडथळा येण्याचा अंदाज आहे.

‘चेतेश्वर पुजारानं एक काम करावं’, डेल स्टेननं दिला बॅटींगचा धडा

फास्ट बॉलर काईल जेमीसन (Kyle Jamieson) आणि ओपनिंग बॅट्सन डेवॉन कॉनवे (Devon Conway) यांच्या खेळामुळे न्यूझीलंडनं दुसऱ्या दिवसावर वर्चस्व गाजवले. जेमीसननं पाच विकेट्स घेतल्या. आठ टेस्टच्या कारकिर्दीमध्ये त्याने ही कामगिरी पाचव्यांदा केली आहे. तर कॉनवेनं सलग तिसऱ्या टेस्टमध्ये अर्धशतक झळकावले. खराब प्रकाशामुळे तिसऱ्या दिवशी अर्धा तास आधीच खेळ थांबवण्यात आला. दुसऱ्या दिवशी देखील 64.4 ओव्हर्स खेळ झाला होता.

First published:

Tags: Cricket news, England, Weather forcast, Weather update