WTC Final: ‘चेतेश्वर पुजारानं एक काम करावं’, डेल स्टेननं दिला बॅटींगचा धडा

टीम इंडियाचा बॅट्समन चेतेश्वर पुजारानं (Cheteshwar Pujara) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये संथ बॅटींग केली. दक्षिण आफ्रिकेचा फास्ट बॉलर डेल स्टेन (Dale Steyn) याने त्यावर प्रश्न उपस्थित केला आहे.

टीम इंडियाचा बॅट्समन चेतेश्वर पुजारानं (Cheteshwar Pujara) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये संथ बॅटींग केली. दक्षिण आफ्रिकेचा फास्ट बॉलर डेल स्टेन (Dale Steyn) याने त्यावर प्रश्न उपस्थित केला आहे.

  • Share this:
    साऊथम्पटन, 21 जून: टीम इंडियाचा बॅट्समन चेतेश्वर पुजारानं (Cheteshwar Pujara) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये संथ बॅटींग केली. पुजारानं खातं उघडण्यासाठी 36 बॉल घेतले. तर तो 54 बॉलमध्ये फक्त 8 रन काढून आऊट झाला. पुजारानं या खेळीत दोन फोर लगावले. त्यानं एकदाही एक रन काढून स्ट्राईक रोटेट केली नाही. या खेळीबद्दल पुजारा सोशल मीडियावर (Social Media) चांगलाच ट्रोल (Troll) झाला होता. दक्षिण आफ्रिकेचा फास्ट बॉलर डेल स्टेन (Dale Steyn) याने प्रश्न उपस्थित केला आहे. ‘इएसपीएन क्रिकइन्फो’ ला बोलताना स्टेननं सांगितलं की, “आपण जास्त रन काढू शकतो हे पुजाराला आऊट झाल्यानंतर जाणवलं असेल. तो त्याच्या बॅटींगचे व्हिडीओ विश्लेषण पाहिल त्यावेळी त्याच्या ते लक्षात येईल. त्याने 0,0,0,0,0,4,4,0,0,0,0,0 असे रन काढले. त्यानंतर तो आऊट झाला. पुजारा बऱ्याच बॉलवर एक रन काढून स्ट्राईक रोटेट करु शकला असता. पण तसं झालं नाही. त्याला स्वत:साठी आणि टीमसाठी रन काढणे शक्य होते.भारतीय बॅट्समननं साऊथमप्टनच्या पिचचा जास्त विचार न करता एक-एक रन काढत खेळ करावा.” असा सल्ला देखील स्टेननं दिला. WTC Final 2021: अश्विन आऊट होताच पत्नी प्रीती निराश, प्रतिक्रिया VIRAL चेतेश्वर पुजाराची त्याच्या भक्कम तंत्रामुळे नेहमी टीम इंडियाची वॉल राहुल द्रविड (Rahul Dravid) बरोबर तुलना होते. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत पुजारानं 9 अर्धशतक झळकावले आहेत. पण त्याला एकही शतक झळकावता आलेलं नाही. मागील सहा इनिंगमध्ये तर त्यासा 25 चा टप्पा ओलांडण्यातही अपयश आले आहे. पुजाराचा हा फॉर्म इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियासाठी काळजीचा विषय आहे.
    Published by:News18 Desk
    First published: