मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /विराट कोहली आणि रवी शास्त्रीच्या चर्चेचा Audio लीक! ऐका, काय बोलत आहेत दोघं

विराट कोहली आणि रवी शास्त्रीच्या चर्चेचा Audio लीक! ऐका, काय बोलत आहेत दोघं

रवी शास्त्री (Ravi Shastri) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांच्यातील चर्चेची एक ऑडिओ क्लिप व्हायरल (Audio Clip Viral) झाली आहे. या दोघांना माईक सुरु आहे हे माहिती नव्हते. त्यामुळे त्यांची आगामी दौऱ्याबद्दल चर्चा सुरु होती.

मुंबई, 3 जून: टीम इंडिया इंग्लंडच्या दौऱ्यावर बुधवारी रवाना झाली. भारतीय टीम या दौऱ्यात सुरुवातीला न्यूझीलंड विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल (WTC Final 2021) खेळणार आहे. 18 जून पासून ही फायनल सुरु होणार आहे. या फायनलकडे सध्या सर्व क्रिकेट विश्वाचं लक्ष लागलं आहे. या फायनलनंतर टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध पाच टेस्टची मालिका खेळणार आहे. या मालिकेला ऑगस्टमध्ये सुरुवात होईल.

इंग्लंड दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी आगामी दौऱ्याबाबत टीम इंडियाची सुरु असलेल्या तयारीबाबत वेगवेगळ्या प्रश्नांना उत्तर दिली.

ही पत्रकार परिषद सुरु होण्यापूर्वी रवी शास्त्री आणि विराट कोहली यांच्यातील चर्चेची एक ऑडिओ क्लिप व्हायरल (Audio Clip Viral) झाली आहे. या दोघांना माईक सुरु आहे हे माहिती नव्हते. त्यामुळे त्यांची आगामी दौऱ्याबद्दल चर्चा सुरु होती.

या छोट्या ऑडिओ क्लिपमध्ये विराट कोहली शास्त्रींना म्हणतो की, 'लाला सिराज को लगा देंगे' त्यावर शास्त्र 'राऊंड द विकेट' असं उत्तर देतो. या छोट्या ऑडिओ क्लिपमुळे न्यूझीलंड विरुद्ध होणाऱ्या फायनल मॅचमध्ये मोहम्मद सिराज खेळण्यावर टीम मॅनेजमेंटचं एकमत आहे. असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

शास्त्रींनी व्यक्त केली नाराजी

इंग्लंडला जाण्यापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत  रवी शास्त्रीयांनी नाराजी व्यक्त केली आहे. एवढ्या मोठ्या स्पर्धेचा निर्णय एका फायनलवरून होऊ नये. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये तीन मॅचची फायनल झाली पाहिजे, असं रवी शास्त्री म्हणाले. रवी शास्त्रींनी सांगितलेल्या या कल्पनेला बेस्ट ऑफ 3 असं म्हणतात. यामध्ये फायनलला पोहोचलेल्या टीममध्ये तीन सामने होतात, यातल्या 2 सामने जिंकलेल्या टीमला विजेता घोषित केलं जातं.

सानिया मिर्झाची काळजी मिटली, आता बिनधास्त करणार ऑलिम्पिकची तयारी

'टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल 3 मॅचची झाली पाहिजे, फक्त एका मॅचवरून निर्णय घेणं योग्य नाही. आम्ही एका मॅचसाठीही तयार आहोत. या फायनलपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतली आहे. फक्त ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच नाही, तर अनेकवेळा कठीण परिस्थितीमधून आम्ही स्वत:ला बाहेर काढलं आणि सीरिज जिंकल्या,' असं शास्त्री यांनी यावेळी सांगितले.

First published:

Tags: Ravi shastri, Team india, Viral audio clip, Virat kohli