जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / WTC Final हरल्यानंतर टीम इंडियाचा Holiday सुरू, 'या' दोन स्पर्धा पाहण्याची तयारी

WTC Final हरल्यानंतर टीम इंडियाचा Holiday सुरू, 'या' दोन स्पर्धा पाहण्याची तयारी

WTC Final हरल्यानंतर टीम इंडियाचा Holiday सुरू, 'या' दोन स्पर्धा पाहण्याची तयारी

टीम इंडियाचे (Team India) खेळाडू आता साऊथम्पटनमधून लंडनला रवाना झाले आहेत. सर्वांना 20 दिवसांचा ब्रेक देण्यात आला आहे. या काळात ते ब्रिटनमधील वेगवेगळ्या ठिकाणी जातील.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 25 जून: टीम इंडियाला पहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं  (WTC Final 2021) विजेतेपद पटकावण्यात अपयश आले. न्यूझीलंडनं फायनल मॅचमध्ये 8 विकेट्सनं पराभव केला. त्यानंतर आता भारतीय टीमला इंग्लंड विरुद्धची टेस्ट सीरिज खेळायची आहे. ही सीरिज सुरु होण्यासाठी अजून वेळ आहे. त्यामुळे भारतीय खेळाडू ब्रिटमधील वेगवेगळ्या जागी 20 दिवसांच्या ब्रेकवर जाणार आहेत. या दरम्यान काही जण विम्बल्डन स्पर्धेचा आनंद घेतील. तर काही युरो कप (Euro Cup 2020) स्पर्धेचं तिकीट मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. बीसीसीआयच्या सुत्रांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार टीम इंडियाचे खेळाडू आता साऊथम्पटनमधून लंडनला रवाना झाले आहेत. सर्वांना 20 दिवसांचा ब्रेक देण्यात आला आहे. या काळात ते ब्रिटनमधील वेगवेगळ्या ठिकाणी जातील. बहुतेक खेळाडूंना लंडन आणि आसपासचा परिसर माहिती असल्यानं ते लंडनमध्येच राहण्याची शक्यता आहे. टीम इंडियाचे काही खेळाडू टेनिस फॅन आहेत. विम्बल्डन स्पर्धेत प्रेक्षकांना परवानगी मिळाली तर काही जण टेनिस पाहण्यासाठी जातील. तर काही जण वेम्बलेमध्ये होणाऱ्या युरो कप मॅचचे तिकीट मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. सर्व खेळाडू 14 जुलै रोजी लंडनमध्ये एकत्र येतील. त्यानंतर ते नॉटिंगहमला रवाना होतील. तिथे पहिली टेस्ट मॅच होणार आहे. टीम इंडियाला धक्का इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाला आणखी एक धक्का बसलाय. टीम इंडियाचा फास्ट बॉलर इशांत शर्माच्या (Ishant Sharma) बोटाची सर्जरी झाली आहे. इशांतच्या उजव्या हाताच्या दोन बोटांना दुखापत झाली आहे. भारत विरुद्ध इंग्लंड सीरिज 4 ऑगस्ट पासून सुरू होणार आहे. पाच टेस्टच्या सीरिजपूर्वी इशांत फिट होईल अशी अपेक्षा आहे. दिशा पाटनी आहे टीम इंडियाच्या खेळाडूची क्रश, इंग्लंडला सुट्टीवर जाण्याची इच्छा टीम इंडियाचा फास्ट बॉलर इशांत शर्माच्या (Ishant Sharma) बोटाची सर्जरी झाली आहे. इशांतच्या उजव्या हाताच्या दोन बोटांना दुखापत झाली आहे. भारत विरुद्ध इंग्लंड सीरिज 4 ऑगस्ट पासून सुरू होणार आहे. पाच टेस्टच्या सीरिजपूर्वी इशांत फिट होईल अशी अपेक्षा आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात