जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / WTC Final: ऐतिहासिक टेस्टचा पहिला दिवस पाण्यात! दुसऱ्या दिवशी कसं असेल हवामान?

WTC Final: ऐतिहासिक टेस्टचा पहिला दिवस पाण्यात! दुसऱ्या दिवशी कसं असेल हवामान?

WTC Final: ऐतिहासिक टेस्टचा पहिला दिवस पाण्यात! दुसऱ्या दिवशी कसं असेल हवामान?

भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचा (WTC Final 2021) पहिला दिवस पावसामुळे वाया गेला. दुसऱ्या दिवशी थोडी आशादायी परिस्थिती आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

साऊथम्पटन, 19 जून : भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचा (WTC Final 2021) पहिला दिवस पावसामुळे वाया गेला. पावसामुळे या ऐतिहासिक फायनलचा टॉसही शुक्रवारी झाला नाही. उरलेल्या दिवसांमध्येही या मॅचमध्ये पावसाचा अडथळा कायम आहे. या ऐतिहासिक लढतीमध्ये पाऊस व्हिलन ठरण्याची दाट शक्यता आहे. मात्र दुसऱ्या दिवशी क्रिकेट फॅन्स आणि खेळाडूंना थोडा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पहिल्या दिवसाच्या तुलनेत दुसऱ्या दिवसाचं हवामान थोडं आशादायी आहे. ब्रिटनमधील हवामान विभागाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार 19 जून रोजी  हवामान थोडे कोरडे असेल. पण रविवार आणि सोमवारी जोरदार पावसाचा अंदाज आहे. हा पाऊस सतत होणार नाही, पण या परिसरातील बहुतेक भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. तर एक्यूवेदरच्या रिपोर्टनुसार साऊथम्टन टेस्टच्या दुसऱ्या दिवशी 70 टक्के पावसाचा अंदाज आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार दुसऱ्या दिवशीही 70 टक्के पावसाची शक्यता आहे. दुपारी 1 वाजेपर्यंत ऊन असेल. त्यानंतर हलक्या पावसाला सुरूवात होऊ शकते. हा सामना जर ड्रॉ झाला तर दोन्ही टीमना विजयी घोषित करण्यात येईल, तसंच बक्षिसाची रक्कमही समसमान देण्यात येईल. टीम इंडियाच्या क्रिकेटपटूला व्हायचं आहे ‘मिस्टर इंडिया’, वाचा काय आहे कारण पाच वर्षांमध्ये फक्त 4 टेस्ट ड्रॉ इंग्लंडमधील हवामान हे लहरी आहे. त्यामुळे साऊथम्पटनच नाही तर कोणत्याही ठिकाणी ही फायनल झाली असती तरी त्यामध्ये पावसाचा अडथळा आला नसता याची खात्री नाही. इंग्लंडमध्ये गेल्या पाच वर्षांमध्ये 32 टेस्ट झाल्या आहेत. यापैकी फक्त 4 टेस्ट ड्रॉ झाल्या आहेत. त्यामुळे पहिल्या दिवसाचा खेळ रद्द झाल्यानंतरही ही टेस्ट रंगतदार होण्याची शक्यता आहे. आता दुसऱ्या दिवशी भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी तीन वाजता खेळ सुरू होईल. दुसऱ्या दिवशी एकूण 98 ओव्हर्सचा खेळ होणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात