मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs SL : टीम इंडियात निवड न झाल्यानं ऋद्धीमान साहा संतापला, गांगुली आणि द्रविडवर केली टीका

IND vs SL : टीम इंडियात निवड न झाल्यानं ऋद्धीमान साहा संतापला, गांगुली आणि द्रविडवर केली टीका

भारत विरूद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातील आगामी टेस्ट आणि टी20 सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा निवड समितीनं शनिवारी केली.  दोन टेस्टच्या या सीरिजमध्ये विकेट किपर ऋद्धीमान साहाचा (Wriddhiman Saha) समावेश करण्यात आलेला नाही

पुढे वाचा ...

मुंबई, 20 फेब्रुवारी : भारत विरूद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातील आगामी टेस्ट आणि टी20 सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा निवड समितीनं शनिवारी केली. दोन टेस्टच्या या सीरिजमध्ये विकेट किपर ऋद्धीमान साहाचा (Wriddhiman Saha) समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे नाराज झालेल्या ऋद्धीमान साहानं बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांच्यावर टीका केली आहे. त्याचबरोबर टीम इंडियाचा हेड कोच राहुल द्रविडनं (Rahul Dravid) दिलेल्या सल्ल्याचाही गौप्यस्फोट केला आहे.

परिस्थिती लगेच कशी  बदलली?

टीम इंडियातील जागेबाबत काळजी करू नये असे आश्वासन बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी आपल्याला दिले होते, असा दावा साहानं केला आहे. 'मी कानपूरमध्ये न्यूझीलंडविरूद्ध औषधं घेऊन नाबाद 61 रन केले होते. त्यावेळी दादाने माझे व्हॉट्सअपवर अभिनंदन केले. मी बीसीसीआय अध्यक्ष असेपर्यंत कोणतीही काळजी करण्याची गरज नाही, असे आश्वासन त्याने मला दिले होते. बोर्डाच्या अध्यक्षांचे हे मत ऐकून माझा आत्मविश्वास वाढला होता. पण, इतक्या लवकर परिस्थिती कशी बदलली? हे मला समजत नाही.' असा सवाल साहाने केला आहे.

द्रविडबद्दल गौप्यस्फोट

'टाईम्स ऑफ इंडिया' नं साहाच्या हवाल्यानं दिलेल्या वृत्तामध्ये टीम इंडियाच्या विकेट किपरनं हेड कोच राहुल द्रविडबाबतही गौप्यस्फोट केला आहे. 'टीम मॅनेजमेंटनं आता माझ्या नावाचा विचार केला जाणार नाही, हे मला सांगितले होते. तसंच राहुल द्रविडने आपल्याला निवृत्तीचा सल्ला दिला होता.' असा दावा साहाने केला आहे.

IND vs WI : विराट कोहलीसह आणखी एका दिग्गज शेवटच्या मॅचमधून आऊट

4 सिनिअर खेळाडूंना वगळले

भारत विरूद्ध श्रीलंका यांच्यातील टेस्ट सीरिजमधून ऋद्धीमान साहासह, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे आणि इशांत शर्मा या 4 सिनिअर खेळाडूंना वगळण्यात आले आहे. 'आपण या सर्वांना श्रीलंका दौऱ्यात निवड होणार नाही, याची कल्पना दिली आहे.त्यांच्यासाठी टीमचे दरवाजे बंद झालेले नाहीत. ते रणजी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करून पुनरागमन करू शकतात,' अशी माहिती निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा (Chetan Sharma) यांनी दिली होती. त्यानंतर साहाने हा दावा केला आहे.

First published:

Tags: Cricket news, India Vs Sri lanka, Rahul dravid, Sourav ganguly