मुंबई, 20 फेब्रुवारी : टीम इंडियाचा अनुभवी विकेटकिपर-बॅटर ऋद्धीमान साहानं (Wriddhiman Saha) सोशल मीडियावर स्क्रीनशॉट शेअर केला आहे. साहाने त्यामध्ये आपल्याला एक पत्रकार मुलाखत देण्यासाठी त्रास देत असल्याचा धक्कादाय खुलासा केला आहे. भारत विरूद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातील आगामी टेस्ट सीरिजसाठी साहाची टीम इंडियामध्ये निवड करण्यात आलेली नाही. बंगालकडून खेळणाऱ्या साहानं यापूर्वी रणजी ट्रॉफी (Ranji Trophy 2021-22) स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला होता. त्याचा भविष्यात टीममध्ये समावेश होणार नसल्याचं निवड समितीनं सांगितल्यानंतर त्यानं हा निर्णय घेतल्याचं वृत्त काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाले होते. ऋद्धीमान साहानं व्हॉट्सअप स्क्रीन शॉट शेअर करत पत्रकार त्याच्यावर कशा पद्धतीनं दबाव टाकत असल्याचं जाहीर केलं आहे. या स्क्रीनशॉटनुसार तो पत्रकार साहाला म्हणतो की, ‘मला मुलाखत दिलीस तर चांगले होईल. त्यांनी (निवड समिती) फक्त एक विकेट किपर निवडला आहे. तू 11 पत्रकार निवडण्याचा प्रयत्न केलास. माझ्या मते ते बरोबर नाही. तुला जास्त मदत करू शकेल त्याची निवड कर. तू माझा कॉल घेतला नाहीस. मी आता तुझी कधीही मुलाखत घेणार नाही. मी ही गोष्ट लक्षात ठेवेन.’ ‘भारतीय क्रिकेटधील माझ्या योगदानानंतरही एका तथाकथित ‘सन्माननीय’ पत्रकाराकडून मला हे सहन करावं लागत आहे’, अशी प्रतिक्रिया साहाने दिली आहे.
PSL : ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूचा PCB वर गंभीर आरोप, हॉटेलमध्ये केले धक्कादायक वर्तन
साहाला वगळण्याचे कारण काय? निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांनी ऋद्धीमान साहाला का वगळण्यात आले या विषयावरील प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले की, ‘एक वेळ अशी येते की तुम्ही दीर्घकाळ खेळू शकत नाही. त्यावेळी तरूणांचा विचार करावा लागतो. तो रणजी ट्रॉफी स्पर्धेत का खेळत नाही, हा विषय माझ्या अधिकारक्षेत्रात नाही. त्याबाबत राज्याचे युनिट सांगू शकेल,’ असे शर्मा यांनी स्पष्ट केले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.