जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / टीम इंडियातील अनुभवी खेळाडूचं करिअर समाप्त, श्रीलंका दौऱ्यातून आऊट!

टीम इंडियातील अनुभवी खेळाडूचं करिअर समाप्त, श्रीलंका दौऱ्यातून आऊट!

टीम इंडियातील अनुभवी खेळाडूचं करिअर समाप्त, श्रीलंका दौऱ्यातून आऊट!

विराट कोहलीनं (Virat Kohli) टेस्ट टीमच्या कॅप्टनसीचा राजीनामा दिल्यानंतर टेस्ट टीममध्ये बदलाचे वारे वाहू लागले आहेत. श्रीलंका सीरिजपूर्वी निवड समितीनं एक मोठा निर्णय घेतला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 9 फेब्रुवारी : विराट कोहलीनं (Virat Kohli) टेस्ट टीमच्या कॅप्टनसीचा राजीनामा दिल्यानंतर टेस्ट टीममध्ये बदलाचे वारे वाहू लागले आहेत. रोहित शर्माची (Rohit Sharma) नवा कॅप्टन म्हणून नियुक्त होण्याची शक्यता आहे. 4 मार्चपासून मोहलीमध्ये सुरू होणाऱ्या भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) टेस्ट सीरिजमध्ये हे बदल दिसू लागतील. याच बदलाचा मुख्य भाग म्हणजे भारतीय टीमचा अनुभवी विकेट किपर ऋद्धीमान साहा (Wriddhiman Saha) या टीमचा सदस्य नसेल. निवड समितीनंही साहाला याची कल्पना दिली आहे. ऋषभ पंत (Rishabh Pant) हा टेस्ट टीमसाठी निवड समितीची पहिली पसंती आहे. तर पंतला बॅक अप म्हणून आंध्र प्रदेशचा विकेट किपर केएस भरतची (KS Bharat) टीममध्ये निवड होईल. 28 वर्षांच्या भरतनं 78 फर्स्ट क्लास मॅचमध्ये 4200 पेक्षा जास्त रन केले आहेत. यामध्ये त्याने एक त्रिशतक देखील झळकावले आहे.न्यूझीलंड विरूद्ध मागच्या वर्षी कानपूरमध्ये झालेल्या कानपूर टेस्टमध्ये  साहा जखमी झाल्यानंतर त्याने बदली खेळाडू म्हणून देखील दमदार कामगिरी केली होती. साहानं घेतली माघार बीसीसीआयमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ’ श्रीलंका विरूद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये निवड होणार नाही याची ऋद्धीमान साहाला कल्पना देण्यात आली आहे. कारण, आता केएस भरतला टीम इंडियामध्ये संधी देण्याची वेळ आहे. याच कारणामुळे साहाने रणजी ट्रॉफी स्पर्धेतून माघार घेतली आहे. बंगाल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अभिषेक डालमिया आणि संयुक्त सचिव स्नेहाशिष गांगुली यांना साहानं वैयक्तिक कारणामुळे रणजी स्पर्धेत खेळणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. IND vs WI : हिटमॅन बुधवारी होणार टीम इंडियाचा किंग! रोहित धोनीलाही मागे टाकणार ऋद्धीमान साहानं 40 टेस्टमध्ये 3 शतकांच्या मदतीनं 1353 रन केले आहेत. त्याची सरासरी 30 पेक्षा कमी आहे. मात्र विकेट किपर म्हणून त्यानं सरस कामगिरी केली आहे. टेस्ट कारकिर्दीमध्ये त्यानं 92 कॅच आणि 12 स्टंपिंग केले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात