मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

बांगलादेशनं केलेल्या पराभवामुळे पाकिस्तान अडचणीत, टीमसमोर वर्ल्ड कपमधून बाहेर जाण्याचं संकट

बांगलादेशनं केलेल्या पराभवामुळे पाकिस्तान अडचणीत, टीमसमोर वर्ल्ड कपमधून बाहेर जाण्याचं संकट

वर्ल्ड कप पात्रता फेरीत (World Cup Qualifier) एकूण 9 टीम खेळत आहेत. त्यापैकी टॉप 3 टीम मुख्य स्पर्धेला पात्र होणार आहेत.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 22 नोव्हेंबर: बांगलादेशच्या पुरुषांच्या क्रिकेट टीमची (Bangladesh Men's Cricket Team) कामगिरी सध्या निराशाजनक होत आहे. टी20 वर्ल्ड कपमधील सुपर 12 मध्ये त्यांनी सर्व मॅच गमावल्या. त्यानंतर पाकिस्तान विरुद्ध (Pakistan vs Bangladesh) पहिले दोन टी20 सामने गमावून तिसऱ्या सामन्यापूर्वीच मालिका गमावली आहे. त्याचवेळी बांगलादेशच्या महिला टीमनं शेवटच्या ओव्हरमध्ये पाकिस्तानच्या महिला टीमचा (Bangladesh W vs Pakistan W) शेवटच्या ओव्हरमध्ये 2 बॉल आणि 3 विकेट्स राखून पराभव केला.

झिम्बाब्वेमधील हरारेमध्ये सध्या महिलांच्या वन-डे वर्ल्ड कपसाठी क्वालिफायर सामने (World Cup Qualifier) सुरू आहेत. या स्पर्धेत एकूण 9 टीम खेळत आहेत. यापैकी टॉप 3 टीमना वर्ल्ड कपमध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे. 202 रनचा पाठलाग करताना बांगलादेशनं सुरूवात चांगली केली.

शर्मीन अख्तरनं 31, फरगान हकनं 45 रन काढले. त्यानंतर रूमाना अहमदनं (Rumana Ahmed)  नाबाद 50 आणि सलमा खातूननं (Salma Khatun) नाबाद 18 रन काढत बांगलादेशला विजय मिळवून दिला. बांगलादेशला शेवटच्या तीन ओव्हरमध्ये 35 रन हवे होते. रूमानानं 48 व्या ओव्हरमध्ये सलग तीन फोर लगावत 18 रन काढले . त्यामुळे बांगलादेशचा विजय सोपा झाला.

हर्षल पटेलच्या नावावर दुसऱ्याच मॅचमध्ये झाला नकोसा रेकॉर्ड, VIDEO

बांगलादेशला शेवटच्या 2 ओव्हरमध्ये 17 रन काढायचे होते. पाकिस्तानच्या डायना बेगनं 49 व्या ओव्हरमध्ये 12 रन काढले. तर उर्वरित 5 रन शेवटच्या ओव्हरमधील 4 बॉलमध्ये त्यांनी पूर्ण केले. रूमाननं 44 बॉलमध्ये नाबाद 50 रन केले. यामध्ये तिनं 6 फोर लगावले. तर सलमानं 13 बॉलमध्ये 2 फोरसह नाबाद 18 रनची खेळी केली.

First published:

Tags: Bangladesh cricket team, Cricket news, Pakistan