मुंबई, 16 मार्च : भारत विरूद्ध इंग्लंड (India Women vs England Women) यांच्यात सध्या महिला वर्ल्ड कप स्पर्धेतील (Women's World Cup 2022) मॅच सुरू आहे. या मॅचमध्ये टीम इंडियाची सुरूवात खराब झाली. भारताच्या प्रमुख बॅटर्सनी साफ निराशा केल्यानं टीम इंडियानं 86 रनमध्ये 7 विकेट्स गमावल्या. कॅप्टन मिताली राजसह (Mithali Raj) प्रमुख बॅटर्स या मॅचमध्ये अपयशी ठरल्या. टीम इंडियाच्या या निराशाजनक कामगिरीतही मितालीचा डग आऊटमधील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मिताली राज इंग्लंड विरूद्ध बॅटींगला येण्यापूर्वीचा हा फोटो आहे. या फोटोमध्ये ती डग आऊटमध्ये पुस्तक वाचण्यात मग्न असल्याचं दिसत आहे. मितालीला पुस्तक वाचण्याचा छंद आहे. ती यापूर्वी देखील क्रिकेट मॅचच्या दरम्यान डग आऊटमध्ये पुस्तक वाचताना दिसत आहे. सध्या वन-डे वर्ल्ड कप ही सर्वात प्रतिष्ठेची स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत मिताली टीमची कॅप्टन आहे. त्या तणावातही मिताली तिचा पुस्तक वाचण्याचा छंद जोपासत आहे.
Mithali Raj was seen reading a book before she came out to bat today. #CWC22 #MithaliRaj #ENGvIND pic.twitter.com/OwaVTaxomt
— Female Cricket #CWC22 (@imfemalecricket) March 16, 2022
मिताली या मॅचमध्ये फारशी कमाल करता आली नाही. ती फक्त 1 रन काढून आऊट झाली. मितालीसाठी हा वर्ल्ड कप निराशाजनक ठरतोय. या वर्ल्ड कपमधील चार इनिंगमध्ये 11.50 च्या सरासरीनं फक्त 46 रन केले आहेत. काळजीची गोष्ट म्हणजे चारपैकी तीन इनिंगमध्ये तिला दोन अंकी रनही करता आले नाहीत.
IPL 2022 : 'या' देशाच्या खेळाडूंनी धुडकावला बोर्डाचा प्रस्ताव, आयपीएल स्पर्धेत खेळण्याचा निर्णय
इंग्लंड विरूद्धच्या मॅचमध्ये टीम इंडियाच्या अन्य खेळाडूंनाही मोठा स्कोअर करण्यातही अपयश आले. भारताकडून स्मृती मंधानाना (Smriti Mandhana) सर्वाधिक 35 रन केले. तर रिचा घोषनं 33 रनची खेळी केली. या वर्ल्ड कपमध्ये फॉर्मात असलेली हरमनप्रीत कौरला आज कमाल करता आली नाही. ती 14 रन काढून आऊट झाली. टीम इंडियाच्या टॉप 8 पैकी 5 बॅटर्सना दोन अंकी रन करण्यातही अपयश आले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Mithali raj, Photo viral