मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs PAK : कॅप्टन मिताली राजनं केली सचिनची बरोबरी, 'हा' रेकॉर्ड करणारी पहिली महिला

IND vs PAK : कॅप्टन मिताली राजनं केली सचिनची बरोबरी, 'हा' रेकॉर्ड करणारी पहिली महिला

पाकिस्तान विरूद्धच्या मॅचमध्ये मैदानात उतरताच टीम इंडियाची कॅप्टन मिताली राजनं (Mithali Raj) इतिहास घडवला आहे.

पाकिस्तान विरूद्धच्या मॅचमध्ये मैदानात उतरताच टीम इंडियाची कॅप्टन मिताली राजनं (Mithali Raj) इतिहास घडवला आहे.

पाकिस्तान विरूद्धच्या मॅचमध्ये मैदानात उतरताच टीम इंडियाची कॅप्टन मिताली राजनं (Mithali Raj) इतिहास घडवला आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 6 मार्च : भारत विरूद्ध पाकिस्तान (Indai vs Pakistan) यांच्यात महिला वर्ल्ड कप स्पर्धेतील (Women's World Cup 2022) महामुकाबला सुरू झाला आहे. पाकिस्तान विरूद्धच्या मॅचमध्ये मैदानात उतरताच टीम इंडियाची कॅप्टन मिताली राजनं (Mithali Raj) इतिहास घडवला आहे. मिताली 6 आयसीसी वन-डे वर्ल्ड कप खेळणारी पहिली महिला क्रिकेटपटू बनली आहे.

यापूर्वी पाकिस्तानचा क्रिकेटपटू जावेद मियांदाद आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं (Sachin Tendulkar) 6 वन-डे वर्ल्ड कप खेळले आहेत. मितालीनं त्यांची बरोबरी केली असून हा रेकॉर्ड करणारी ती पहिली महिला क्रिकेटपटू ठरली आहे. मितालीनं 2000 साली न्यूझीलंडमध्ये पहिली वर्ल्ड कप स्पर्धा खेळली होती. त्यानंतर 2005, 2009, 2013 आणि 2017  साली झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेतही मिताली टीम इंडियाकडून खेळली आहे.

मितालीचं वन-डे करिअर

मितालीनं वन-डेसह टी20 मध्येही टीम इंडियाची कॅप्टनसी केली आहे. मात्र वन-डे क्रिकेटवर लक्ष देण्यासाठी तिने टी20 टीमची कॅप्टनसी सोडण्याचा निर्णय घेतला. मितालीनं आजवर 225 वन-डेमध्ये 51.85 च्या सरासरीनं 7623 रन केले आहेत. यामध्ये 7 शतक आणि 62 अर्धशतकांचा समावेश आहे.

IND vs PAK : टीम इंडियासाठी No Good Morning, न्यूझीलंडमधून आली काळजीची बातमी

मितालीची निराशा

सहाव्या वर्ल्ड कपमध्ये मितालीनं निराशा केली आहे. पाकिस्तान विरूद्धच्या मॅचमध्ये ती फक्त 9 रन काढून आऊट झाली. हे रन काढण्यासाठी तिने 36 बॉल घेतले. मितालीचा हा शेवटचा वर्ल्ड कप आहे. आजवरच्या कारकिर्दीमध्ये तिला वर्ल्ड कप स्पर्धा जिंकण्यात अपयश आलं आहे. आता यंदाच्या स्पर्धेत हे स्वप्न पूर्ण करण्याचा तिचा प्रयत्न असेल.

First published:

Tags: Cricket news, India vs Pakistan, Mithali raj