मुंबई, 6 मार्च : न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या महिला वन-डे क्रिकेट वर्ल्ड कपमधील (Women's Cricket World Cup 2022) पहिल्याच मॅचमध्ये टीम इंडिया अडचणीत आली आहे. पाकिस्तान विरूद्धच्या मॅचमध्ये टीम इंडियाची मिडल ऑर्डर कोसळली. स्मृती मंधाना (Smriti Mandhana) आणि दीप्ती शर्मा (Dipti Sharma) यांनी दुसऱ्या विकेटसाठी 92 रनची पार्टनरशिप केली होती. पण, त्यानंतर टीम इंडियाची घसरगुंडी उडाली.
टीम इंडियाची कॅप्टन मिताली राजनं (Mithali Raj) टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटींग करण्याचा निर्णय घेतला. मितालीच्या या निर्णयाचा भारतीय ओपनर्सना फायदा घेता आला नाही.स्मृती मंधाना (Smriti Mandhana) आणि शफाली वर्मा (Shafali Verma) या जोडीनं भारतीय इनिंगची सुरूवात केली.शफालीनं सपशेल निराशा केली. ती शून्यावर आऊट झाली. पाकिस्तानची फास्ट बॉलर डायना बेगनं शफालीला बोल्ड केले. टीम इंडियाची आक्रमक बॅटर म्हणून शफालीची ओळख आहे. पण, सध्या शफालीचा फॉर्म हरपला आहे.
ऋद्धीमान साहानं BCCI ला सांगितलं 'त्या' पत्रकारचं नाव! द्रविड, गांगुलीबद्दल म्हणाला...
शफाली आऊट झाल्यानंतर स्मृती-दीप्ती जोडीनं चांगली पार्टनरशिप केली. स्मृतीनं तिचं अर्धशतकही पूर्ण केले. पण, त्यानंतर टीम इंडियाची घसरगुंडी उडाली. दीप्ती आणि स्मृती पाठोपाठ आऊट झाल्या. त्यानंतर हरमनप्रीत कौरला मोठी खेळी करण्यात अपयश आले. हरमन फक्त 5 रन काढून आऊट झाली. टीम इंडियाची फॉर्मातील विकेट किपर बॅटर रिचा घोषनं (Richa Ghosh) फक्त 1 रन काढला. रिचानंतर कॅप्टन मिताली राजही आऊट झाल्यानं टीम इंडियाला मोठा धक्का बसला. टीम इंडियाची अवस्था 6 आऊट 114 अशी झाली.
Ohhh, that's a HUGGEE WICKETT!!! MITHALI RAJ IS CAUGHT OUT : 9 (36) #INDvPAK #CWC22
— Female Cricket #CWC22 (@imfemalecricket) March 6, 2022
टीम इंडियानं वर्ल्ड कपमधील पहिल्याच मॅचमध्ये 3 फास्टर आणि 3 स्पिनर्सचा समावेश करत बॉलिंग मजबूत केली आहे. आता पाकिस्तानला पराभूत करण्यासाठी भारतीय बॉलर्सना चांगली कामगिरी करावी लागेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, India vs Pakistan