जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Women Ashes : टेस्ट क्रिकेटमध्ये T20 सारखा थरार, शेवटच्या बॉलवर लागला मॅचचा निकाल

Women Ashes : टेस्ट क्रिकेटमध्ये T20 सारखा थरार, शेवटच्या बॉलवर लागला मॅचचा निकाल

Women Ashes : टेस्ट क्रिकेटमध्ये T20 सारखा थरार, शेवटच्या बॉलवर लागला मॅचचा निकाल

टेस्ट क्रिकेटमध्येही T20 क्रिकेटसारखा थरार पाहयला मिळू शकतो. अगदी शेवटच्या बॉलपर्यंत मॅचचा निकाल अनिश्चित असू शकतो हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 30 जानेवारी : टेस्ट क्रिकेटमध्येही T20 क्रिकेटसारखा थरार पाहयला मिळू शकतो. अगदी शेवटच्या बॉलपर्यंत मॅचचा निकाल  अनिश्चित असू शकतो हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. ऑस्ट्रेलिया विरूद्ध इंग्लंड यांच्या महिला क्रिकेट टीममधील एकमेव अ‍ॅशेस टेस्टचा (Women Ashes) निकाल अगदी शेवटच्या बॉलवर लागला. कॅनबेरामध्ये झालेल्या या मॅचमध्ये दोन्ही टीमनी शेवटच्या बॉलपर्यंत जोरदार लढत दिली. ऑस्ट्रेलियानं ही टेस्ट जिंकण्यासाठी इंग्लंडला 257 रन करण्याचे आव्हान दिले होते. इंग्लंडच्या टॉप ऑर्डरनं जिद्दीनं  खेळ करत या मॅचवर पकड मिळवली होती. इंग्लंडला शेवटच्या तीन ओव्हर्स म्हणजे 18 बॉलमध्ये जिंकण्यासाठी फक्त 17 रन हवे होते. तसंच त्यांच्या तीन विकेट्स शिल्लक होत्या. इंग्लंडच्या इनिंगमधील 46 व्या ओव्हरमध्ये 2 विकेट गेल्यानं टीम दबावात आली. ऑस्ट्रेलिया मॅच जिंकेल अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी इंग्लंडच्या शेवटच्या जोडीनं मॅच ड्रॉ करण्यावर भर दिला. त्यांनी शेवटच्या 2 ओव्हर्समध्ये फक्त 1 रन करत मॅच अखेर ड्रॉ केली.

जाहिरात

इंग्लंडकडून शेवटच्या इनिंगमध्ये विनफिल्ड हिल आणि टॅमी ब्यूमोंट यांनी अर्धशतकी भागिदारी केली. विनफिल्ड 33 तर ब्यूमोंट 36 रन काढून आऊट झाली. त्यानंतर कॅप्टन नाईटनं 70 बॉलमध्ये 72 रनची भागिदारी करत इंग्लंडला विजयाच्या जवश आणले. पण, त्याचवेळी ऑस्ट्रेलियानं शेवटच्या 26 रनमध्ये 6 विकेट्स घेत इंग्लंडला अडचणीत आले. अखेर दोन्ही टीमला ड्रॉ वर समाधान मानावे लागले. ‘डोनट’वाली Love Story! मिस्टर आणि मिसेस स्टार्कचा रोमान्स कॅमेऱ्यात कैद, Cute Video Viral यापूर्वी ऑस्ट्रेलियानं पहिल्या इनिंगमध्ये 40 रनची आघाडी घेतली होती. त्यानंतर दुसरी इनिंग 7 आऊट 216 या धावसंख्येवर घोषित केली. इंग्लंडला विजयासाठी 12 रन कमी पडले. त्यांनी दुसऱ्या इनिंगमध्ये 9 आऊट 245 रन केल्यानं ही मॅच अखेर ड्रॉ झाली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात