दुबई, 19 सप्टेंबर : आयपीएलच्या दुसऱ्या राऊंडच्या पहिल्याच (IPL 2021) मॅचआधीच विराट कोहलीने (Virat Kohli) आणखी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. या आयपीएलच्या या मोसमानंतर विराट कोहली बँगलोरचा (RCB) कर्णधार राहणार नाही. आपण आरसीबीचं नेतृत्व सोडलं असलं तरीदेखील आपण शेवटपर्यंत आरसीबीसाठीच खेळू असं विराटने स्पष्ट केलं आहे. आरसीबीने आपल्या ट्वीटर अकाऊंटवर एक व्हिडिओ शेयर केला आहे, यात विराटने आपण कर्णधारपद सोडणार असल्याचं जाहीर केलं. तसंच त्याने आरसीबीच्या सगळ्या चाहत्यांना पाठिंबा दिल्याबद्दल शुभेच्छाही दिल्या.
Virat Kohli to step down from RCB captaincy after #IPL2021
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) September 19, 2021
“This will be my last IPL as captain of RCB. I’ll continue to be an RCB player till I play my last IPL game. I thank all the RCB fans for believing in me and supporting me.”: Virat Kohli#PlayBold #WeAreChallengers pic.twitter.com/QSIdCT8QQM
याआधी विराट कोहलीने टीम इंडियाच्या टी-20 फॉरमॅटच्या कॅप्टन्सीचाही राजीनामा दिला आहे. पुढच्या महिन्यात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपनंतर विराट कोहली भारताच्या टी-20 टीमचाही कर्णधार राहणार नाही. आपल्या बॅटिंगवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी विराटने हा निर्णय घेतला आहे. 6 महिन्यांपासून सुरु होता विराट आणि BCCI यांच्यातील संघर्ष, वाचा Inside Story विराटने कर्णधार म्हणून टीम इंडियाला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवलं, पण त्याचं आयपीएलमधलं कॅप्टन्सीचं रेकॉर्ड खराब आहे. विराटने आरसीबीला एकही ट्रॉफी जिंकवून दिलं नाही, एवढच नाही तर त्याची विजयाची टक्केवारीही 50 टक्क्यांपेक्षा कमी आहे. 2013 साली विराट कोहलीला आरसीबीचं नेतृत्व देण्यात आलं, यानंतर त्याच्या नेतृत्वात टीमला 60 मॅच जिंकता आल्या, तर त्यांना 65 मॅचमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. विराट कोहलीच्या नेतृत्वात आरसीबीची विजयी टक्केवारी 48.04 एवढी आहे. तर दुसरीकडे मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) सर्वाधिक 60.16 टक्के मॅच जिंकल्या आहेत. एवढच नाही तर रोहितने मुंबईला पाचवेळा चॅम्पियन बनवलं आहे.