मुंबई, 25 डिसेंबर : टीम इंडियाचा दिग्गज ऑफ स्पिनर हरभजन सिंगनं (Harbhajan Singh) सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. तब्बल 23 वर्षांच्या मोठ्या कालावधीनंतर हरभजननं क्रिकेटला अलविदा केला. टेस्ट क्रिकेटमध्ये 417 विकेट्स घेणारा हरभजन या फॉर्मेटमधील भारताचा चौथा यशस्वी बॉलर आहे. हरभजननं निवृत्ती घेताच त्याच्यावर क्रिकेट विश्वातून शुभेच्छांचा वर्षाव झाला. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरपासून (Sachin Tendulkar) अनेक क्रिकेटपटूंनी हरभजनला शुभेच्छा देत त्याच्या आठवणी शेअर केल्या आहेत. या सर्व प्रतिक्रियांमध्ये टीम इंडियाचा फास्ट बॉलर श्रीसंतची (Sreesanth) प्रतिक्रिया लक्षवेधी ठरली.
'तू फक्त भारतामधील नाही तर जगातील सर्वोत्तम खेळाडू आहेस. भज्जीपा, तुझी ओळख असणे आणि तुझ्यासोबत खेळायला मिळणे हा माझ्यासाठी सन्मान आहे. माझा स्पेल सुरु होण्यापूर्वीची तूझी मिठी मी नेहमी जतन करेन, खूप सारे प्रेम आणि आदर.' असे ट्विट करत श्रीसंतने हरभजनला टॅग केले आहे.
@harbhajan_singh Ur gonna be the one of the best ever played cricket not just for india but in world of cricket..it’s a huge honour to know u and to have played with you b bhajjipa ….will always cherish the lovely hugs( lucky for me ) before my spells ) lots of love and respect pic.twitter.com/5IgYJk4HcD
— Sreesanth (@sreesanth36) December 24, 2021
आयपीएल स्पर्धेत झाला होता वाद
आयपीएल स्पर्धेच्या पहिल्या सिझनमध्ये (IPL 2008) हरभजननं श्रीसंतला थप्पड लगावल्याचा आरोप झाला होता. किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध मुंबई इंडियन्स या लढतीनंतर श्रीसंतचा रडका चेहरा तेव्हा सर्व जगाने पाहिला. या घटनेनंतर हरभजनला 5 सामन्यांसाठी निलंबित करण्यात आले होते. अर्थात त्यानंतरच्या काळात दोन्ही क्रिकेटपटूंमधील संबंध चांगलेच सुधारले. 2011 साली टीम इंडियानं जिंकलेल्या वर्ल्ड कप टीमचे श्रीसंत आणि हरभजन हे दोघेही सदस्य होते.
हरभजन सिंग निवृत्तीनंतर गाजवणार 'नवे मैदान', वाचा काय असेल भज्जीची 'सेकंड इनिंग'!
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, Harbhajan singh, Sreesanth