मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

रोहितच्या सहकाऱ्याची कमाल, धोनीचा 15 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड मोडला

रोहितच्या सहकाऱ्याची कमाल, धोनीचा 15 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड मोडला

मुंबई इंडियन्समधील (Mumbai Indians) रोहित शर्माच्या (Rohit Sharma) सहकाऱ्यानं महेंद्रसिंह धोनीच्या (MS Dhoni) नावावर असलेला 15 वर्ष जूना रेकॉर्ड मोडला आहे.

मुंबई इंडियन्समधील (Mumbai Indians) रोहित शर्माच्या (Rohit Sharma) सहकाऱ्यानं महेंद्रसिंह धोनीच्या (MS Dhoni) नावावर असलेला 15 वर्ष जूना रेकॉर्ड मोडला आहे.

मुंबई इंडियन्समधील (Mumbai Indians) रोहित शर्माच्या (Rohit Sharma) सहकाऱ्यानं महेंद्रसिंह धोनीच्या (MS Dhoni) नावावर असलेला 15 वर्ष जूना रेकॉर्ड मोडला आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 12 जून :  महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni), एबी डीव्हिलियर्स (AB de Villiers) आणि शाहीद आफ्रिदी (Shahid Afridi) या तिघांच्या नावावर असलेला टेस्ट क्रिकेटमधील एक रेकॉर्ड शुक्रवारी मोडला. दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज (SA vs WI) यांच्यामध्ये सेंट लूसीया इथं सुरू असलेल्या पहिल्या टेस्टवर आफ्रिकीने पकड घट्ट केली आहे.

दक्षिण आफ्रिकेनं वेस्ट इंडिजला पहिल्या इनिंगमध्ये फक्त 97 रन वर ऑल आऊट केले. या टेस्टचा दुसरा दिवस रोहित शर्माचा (Rohit Sharma) मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) मधील सहकारी क्विंटन डी कॉक (Quinton de Kock) याने गाजवला. त्याने 170 बॉलमध्ये 12 फोर आणि 7 सिक्सच्या मदतीने नाबाद 141 रन केले. डी कॉकचे टेस्ट कारकीर्दीमधील हे चौथे शतक आहे. त्याच्या या खेळीमुळे दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या दिवशी 322 पर्यंत मजल मारली.

डी कॉकने या खेळीच्या दरम्यान धोनी, डीव्हिलियर्स आणि आफ्रिदीचा एक रेकॉर्ड मोडला आहे. या तिघांनीही वेस्ट इंडिज विरुद्ध एक इनिंगमध्ये सहा सिक्स लगावले होते. आफ्रिदीनं 2005, धोनीनं 2006 तर डीव्हिलियर्सनं 2010 साली ही कामगिरी केली होती. डी कॉकने सात सिक्स लगावत या सर्वांना मागे टाकले आहे.

वेस्ट इंडिजची दुसऱ्या इनिंगमध्येही सुरुवात खराब झाली. दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस वेस्ट इंडिजने 4 आऊट 82 रन केले आहेत. वेस्ट इंडिजची टीम अजूनही 143 रननं पिछाडीवर आहे.

नॉर्कियाचा खतरनाक बाऊन्सर!

या मॅचच्या पहिल्याच दिवशी वेस्ट इंडिजच्या टॉप ऑर्डरचा बॅट्समन एनक्रुमाह बॉनर (Nkrumah Bonner) याला दुखापत झाली, त्यामुळे तो या टेस्टमधून बाहेर झाला आहे. दक्षिण आफ्रिकेचा फास्ट बॉलर एनरिक नॉर्कियाचा (Anrich Nortje) फास्ट बॉलर एनक्रुमाहच्या हेल्मेटला लागला, यानंतर त्याला चक्कर यायला लागली आणि डोकं दुखायला लागलं.

अंपायरवर संतापून स्टम्प उखडले, गैरवर्तनानंतरही शाकीबच्या बायकोचा नवऱ्याला पाठिंबा

वेस्ट इंडिजची इनिंग संपल्यानंतर बॉनर फिल्डिंगला आला नाही, यानंतर आता तो उरलेल्या सामन्यामध्येही खेळणार नाही, असं वृत्त समोर आलं आहे. बॉनरच्या जागी कायरन पॉवेलला कनकशन सबस्टिट्युट म्हणून निवडण्यात आलं आहे.

First published:

Tags: MS Dhoni, Quinton de kock, South africa, West indies