मुंबई, 14 मार्च : रणजी ट्रॉफी स्पर्धेची (Ranji Trophy 2022) प्री क्वार्टर फायनल सध्या सुरू आहे. या मॅचमध्ये झारखंडनं नागालँड विरूद्ध (Jharkhand vs Nagaland) धावांचा डोंगर उभा केला आहे. झारखंडच्या कुमार कुशाग्र (Kumar Kushagra) या 17 वर्षांच्या खेळाडूनं यावेळी इतिहास रचला. तिसरीच फर्स्ट क्लास मॅच खेळणाऱ्या कुमारनं 269 बॉलमध्ये 266 रन काढले. त्याने यावेळी पाकिस्तानचा माजी कॅप्टन जावेद मियांदाद (Javed Miandad) आणि भारताच्या इशान किशनचा (Ishan Kishan) रेकॉर्ड मोडला. कुशाग्रनं 17 वर्ष 141 दिवसाचा असतानाच हा रेकॉर्ड केला. मियांदादनं 1975 साली 17 वर्ष 311 दिवस वय असताना द्विशतक झळकावले होते. त्याचा 47 वर्ष जुना रेकॉर्ड कुशाग्रनं मोडला आहे. भारताकडून इशान किशननं 18 वर्ष 111 दिवस वय होते तेव्हा फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावले होते. फर्स्ट क्लास क्लास क्रिकेटमध्ये झारखंडकडून सर्वाधिक वैयक्तिक रन करण्याचा इशानचा रेकॉर्ड त्याला मोडता आला नाही. इशान किशननं 2016 साली दिल्लीविरूद्ध 273 रन केले होते. कुशाग्रचं फर्स्ट क्लास क्रिकेटमधील हे पहिलंच द्विशतक आहे. तो 2019 साली विनू मंकड ट्रॉफी स्पर्धेत सर्वात प्रथम चर्चेत आला होता. त्या स्पर्धेत त्यानं 7 मॅचमध्ये 535 रन केले होते.
The batting blitz continues! 👍 👍
— BCCI Domestic (@BCCIdomestic) March 13, 2022
2⃣5⃣0⃣ up for Kumar Kushagra. 👏 👏
Jharkhand move closer to the 650-run mark against Nagaland.
Follow the match ▶️ https://t.co/Ng12bRPPu5#RanjiTrophy | #PQF | #JHAvNAG | @Paytm pic.twitter.com/iK52BVLlzr
‘टाईम्स ऑफ इंडिया’ मधील बातमीनुसार कुशाग्रचे वडील शशिकांत यांनी मुलगा क्रिकेटपटू व्हावा म्हणून घरामध्येच ग्रंथालय तयार होते. ‘मी माझ्या घरामध्ये क्रिकेटचे ग्रंथालय तयार केले होते. त्यामध्ये ब्रॅडमन ते स्टीव्ह वॉ पर्यंतच्या क्रिकेटपटूंच्या पुस्तकाचा समावेश होता. मी नेटवर या खेळाडूंचे तंत्र पाहात असे. त्यानंतर त्याच गोष्टी त्यांच्या पुस्तकाच वाचून त्या पद्धतीनं कुशाग्रकडून सराव करून घेत असे.’ असे शशिकांत यांनी सांगितले. ते जीएसटी विभागात जिल्हा कमिशनर आहेत. Women’s World Cup : 13 बॉलमध्ये फिरली मॅच, बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय झारखंडचा डोंगर झारखंडनं नागालँड विरूद्ध पहिल्यांदा बॅटींग करताना 880 रनचा डोंगर उभारला. झारखंडकडून कुमार कुशाग्रनं सर्वाधिक 266 रन केले. तर विराट सिंह (107) आणि शाहबाज नदीम (177) यांनीही शतक झळकावले. अकाराव्या क्रमांकावर खेळायला आलेल्या राहुल शुक्लानंही 85 रनची खेळी केली.

)







