मुंबई, 14 मार्च : न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या महिला वर्ल्ड कपमध्ये (Women’s World Cup 2022) धक्कादायक निकालाची नोंद झाली आहे. बांगलादेशनं पाकिस्तानवर 9 रननं (Bangladesh Women vs Pakistan Women) ऐतिहासिक विजय मिळवला. पाकिस्तानचा या स्पर्धेतील सलग चौथा पराभव आहे. त्यांचे स्पर्धेतील आव्हान यापूर्वीच संपुष्टात आले आहे. आता तळाचा क्रमांक टाळण्यासाठी त्यांना मोठी कमाल करावी लागणार आहे. बांगलादेशनं पहिल्यांदा बॅटींग करत 50 ओव्हर्समध्ये 7 आऊट 234 रन केले. हा बांगलादेश महिला टीमचा वन-डे क्रिकेटमधील सर्वाधिक स्कोअर होता. त्याला उत्तर देताना मजबूत स्थितीमध्ये असलेल्या पाकिस्तानची अचानक घसरगुंडी उडाली. त्यांची टीम संपूर्ण 50 ओव्हर्समध्ये 9 आऊट 225 रनच करू शकली.
Bangladesh beat Pakistan by 9 runs to win their first ever ICC Women's Cricket World Cup match 👏#CWC22 pic.twitter.com/ktZkJXB7DX
— ICC (@ICC) March 14, 2022
बांगलादेशच्या मोठ्या स्कोअरचा पाठलाग करता पाकिस्ताननं सुरूवात दमदार केली होती. त्यांच्या ओपनिंग जोडीनं स्पर्धेत पहिल्यांदा अर्धशतकी पार्टनरशिप केली. 42 व्या ओव्हरमध्ये पाकिस्तानचा स्कोअर 2 आऊट 183 अशी भक्कम स्थिती होती. पाकिस्तानला शेवटच्या आठ ओव्हर्समध्ये 52 रन करायचे होते. तसेच त्यांच्या 8 विकेट्स शिल्लक होत्या. बांगलादेशच्या फातिमा खातूननं 3 विकेट्स घेत या विजयात मोठा वाटा उचलला. IPL 2022 : ऋतुराज आणि दीपक चहरच्या खेळण्याबाबत CSK कडून आलं मोठं अपडेट! पाकिस्तानची या भक्कम स्थितीवरून अचानक घसरगुंडी उडाली. पुढच्या 13 बॉलमध्ये त्यांनी 5 रनच्या मोबदल्यात 5 विकेट्स गमावल्या. या धक्क्यातून पाकिस्तानची टीम सावरलीच नाही. बांगलादेशची महिला टीम (Bangladesh Women’s Team) यंदा पहिल्यांदाच वर्ल्ड कप स्पर्धेसाठी पात्र झाली आहे. पहिल्या दोन मॅचमध्ये मोठा पराभव झाल्यानंतर त्यांनी पाकिस्तानचा पराभव करत स्पर्धेच्या इतिहासातील पहिला विजय मिळवला आहे. या विजयासह बांगलादेशची टीम आता पॉईंट टेबलमध्ये सहाव्या क्रमांकावर पोहचली आहे. त्यांनी पाकिस्तानसह विद्यमान चॅम्पियन इंग्लंडलाही मागं टाकलं आहे.