मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

VIDEO: T20 मॅचमध्ये भयंकर घटना! 10 मिनिटात 2 खेळाडूंना चक्कर, हॉस्पिटलमध्ये दाखल

VIDEO: T20 मॅचमध्ये भयंकर घटना! 10 मिनिटात 2 खेळाडूंना चक्कर, हॉस्पिटलमध्ये दाखल

वेस्ट इंडिजच्या (West Indies) या विजयाला गालबोट लागल्याची घटना मैदानात घडली.फक्त 10 मिनिटांंमध्ये वेस्ट इंडिजच्या दोन खेळाडू चक्कर येऊन मैदानात पडल्या. त्यांची मैदानातच शुद्ध हरपली.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 3 जुलै : पाकिस्तानची महिला टीम (Pakistan Women Team) सध्या वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे. शुक्रवारी झालेल्या दुसऱ्या टी 20 मॅचमध्ये वेस्ट इंडिजनं पाकिस्तानचा डकवर्थ लुईस पद्धतीच्या (D/L Method) आधारावर 7 रननं पराभव केला.  या विजयाबरोबरच वेस्ट इंडिजनं 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे.

वेस्ट इंडिजच्या या विजयाला मैदानात गालबोट लागले. पाकिस्तानची बॅटींग सुरु असताना हा प्रकार घडला. फक्त 10 मिनिटांंमध्ये वेस्ट इंडिजच्या दोन खेळाडू चक्कर येऊन मैदानात पडल्या. त्यांची मैदानातच शुद्ध हरपली. त्यांची गंभीर अवस्था पाहून तातडीनं हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

आलिया एलीन (Aaliyah Alleyne) आणि चेडीयन नेशन (Chedean Nation) अशी या दोघींची नावं आहेत. त्यांना स्ट्रेचरच्या मदतीनं मैदानाच्या बाहेर नेण्यात आले. त्यांची तब्येत का बिघडली? याचे कारण अजून समजलेलं नाही.

The on air commentators confirm that one more West Indian player has collapsed. #WIWvPAKW #WIvPAK pic.twitter.com/g9zjvAN72c

— Female Cricket (@imfemalecricket) July 2, 2021

बेशुद्ध होण्यापूर्वी गाजवलं मैदान

चेडियन नेशननं या मॅचमध्ये बेशुद्ध होण्यापूर्वी मैदान गाजवले होते. वेस्ट इंडिजनं पहिल्यांदा बॅटींग करताना पाकिस्तानसमोर विजयासाठी 126 रनचे टार्गेट ठेवले होते. यामध्ये चेडियननं  33 बॉलमध्ये 28 रनची खेळी केली होती. तर आलियानं नाबाद 2 रन काढले होते.

IPL 2021 मध्ये पेनकिलर घेऊन खेळल्याचा माजी कॅप्टनचा खुलासा

पावसाचा अडथळा आलेल्या या मॅचमध्ये पाकिस्ताननं 18 ओव्हर्समध्ये 6 आऊट 103 रन काढले. त्यानंतर डकवर्थ लुईस मेथडच्या आधारे वेस्ट इंडिजला 7 रननं विजयी घोषित करण्यात आले.

First published:

Tags: Cricket news, Pakistan, West indies player