Home /News /sport /

IPL 2021 मध्ये पेनकिलर घेऊन खेळल्याचा माजी कॅप्टनचा खुलासा

IPL 2021 मध्ये पेनकिलर घेऊन खेळल्याचा माजी कॅप्टनचा खुलासा

कोरोना व्हायरसमुळे स्थगित झालेली आयपीएल स्पर्धेचा 14 वा सिझन (IPL 2021) सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात यूएईमध्ये होणार आहे. या स्पर्धेची तारीख अद्याप जाहीर झालेली नसली तरी सर्वच फ्रँचायझींनी याची तयारी सुरु केली आहे.

    मुंबई, 3 जुलै : कोरोना व्हायरसमुळे स्थगित झालेली आयपीएल स्पर्धेचा 14 वा सिझन (IPL 2021) सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात यूएईमध्ये होणार आहे. या स्पर्धेची तारीख अद्याप जाहीर झालेली नसली तरी सर्वच फ्रँचायझींनी याची तयारी सुरु केली आहे. आयपीएल 2021 मधील आत्तापर्यंत झालेल्या 29 सामन्यांनतर दिल्ली कॅपिटल्सची (Delhi Capitals) टीम नंबर 1 वर आहे. या टीममधील बॅट्समन स्टिव्ह स्मिथनं (Steve Smith) एक खुलासा केला आहे. ऑस्ट्रेलिया आणि राजस्थान रॉयल्स (RR) टीमचा माजी कॅप्टन असलेल्या स्मिथ या सिझनमध्ये पहिल्यांदाच दिल्लीकडून खेळतो आहे. या सिझनमध्ये आपण पेन किलर घेऊन खेळल्याचा खुलासा स्मिथनं केला आहे. ‘माझ्या कोपराला झालेल्या दुखापतीमुळे मी 100 टक्के योगदान देऊ शकलो नाही. या दुखापतीनं मला आयपीएल स्पर्धेत बराच त्रास दिला. मी बॅटींग करण्यासाठा पेन किलर घेऊन मैदानात उतरत असे,’’ असे स्मिथने सांगितले. आयपीएल स्पर्धा स्थगित होण्यापूर्वी स्मिथनं 6 मॅचमध्ये 111.82 च्या सरासरीनं 104 रन काढले आहेत. 'मी त्यांना 2-3 थप्पड लगावल्या असत्या', आपल्याच खेळाडूंवर रणतुंगा संतापला वर्ल्ड कपमधील सहभाग अनिश्चित स्टिव्ह स्मिथनं या दुखापतीमुळे आपण टी-20 वर्ल्ड कपमधून माघार घेऊ शकतो, असे संकेत दिले आहेत. टी-20 वर्ल्ड कपला अजून वेळ आहे. दुखापतीतून मी बरा होत आहे. टी-20 टीममध्ये सहभागी व्हायला मला आवडेल, पण माझ्यासाठी टेस्ट क्रिकेट सर्वाधिक महत्त्वाचं आहे. ऍशेससाठी फिट होणं माझं लक्ष्य आहे. मागच्या काही ऍशेसमध्ये मी जशी कामगिरी केली, त्याचीच पुनरावृत्ती करण्याची माझी इच्छा आहे. यासाठी मला टी-20 वर्ल्ड कपमधून माघार घ्यावी लागली तरी चालेल, पण तसं करण्याची माझी इच्छा नाही,' असं स्मिथने क्रिकेट डॉट कॉमशी बोलताना सांगितलं. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात युएईमध्ये टी-20 वर्ल्ड कप होणार आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news, Delhi capitals, IPL 2021

    पुढील बातम्या