मुंबई, 21 मे : वेस्ट इंडिजच्या (West Indies) फास्ट बॉलर्सनी दोन दशकं क्रिकेट विश्वावर राज्य केले. या तोफखान्याची शान असलेले फास्ट बॉलर पॅट्रीक पॅटरसन (Patrick Patterson) सध्या हालाखीचं आयुष्य जगत आहे. या माजी बॉलरकडे दोन वेळेसच्या जेवणाचे देखील पैसे नाहीत. त्यांची ही अवस्था पाहून टीम इंडियाचा ऑफ स्पिनर आर. अश्विन (R. Ashwin) भावुक झाला असून त्याने सर्वांना मदतीचे आवाहन केले आहे.
क्रीडा पत्रकार भारत सुंदरसन यांनी सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून पॅटसरन यांच्या सध्याच्या परिस्थितीची जगाला माहिती दिली आहे. पॅट्रिक पॅटरसन यांची परिस्थिती रोज खराब होत चालली आहे. ते सध्या किराना सामान खरेदी करण्यास किंवा दोन वेळा जेवणाची सोय करण्यास देखील असमर्थ आहेत. मी त्यांच्यासाठी @gofundme तयार केले आहे. हे त्यांच्याकडून क्रिकेट विश्वाला आवाहन आहे. कृपया तुमचे प्रेम दाखवा.'
अश्विन झाला भावुक
सुंदरसन यांनी केलेलं ट्विट पाहून आर. अश्विन देखील भावुक झाला आहे. 'पॅट्रीक पॅटरसन द ग्रेट यांना रोजच्या जगण्यासाठी तुमच्या मदतीची गरज आहे. भारतीय चलनामध्ये त्यांना मदत करण्याचा कोणताही पर्याय नाही. कुणाला मदत करणे शक्य असेल, तर कृपया करावी.' असं आवाहन अश्विननं केलं आहे. अश्विनचं हे ट्विट व्हायरल (Viral) झाले असून अनेक क्रिकेट फॅन्सनी पॅटरसन यांना मदत करण्याची तयारी दाखवली आहे.
Patrick Patterson the great needs help for his daily survival, there are no options to pay in Indian currency. If someone can help, please do so. 🙏 https://t.co/z1KDurk65M
— Mask up and take your vaccine🙏🙏🇮🇳 (@ashwinravi99) May 20, 2021
भारताविरुद्ध जबरदस्त कामगिरी
पॅट्रीक पॅटरसन यांनी 28 टेस्टमध्ये 93 विकेट्स घेतल्या आहेत. दिल्लीमध्ये 1987 साली झालेल्या टेस्टमध्ये त्यांनी टीम इंडियाला (Team India) हादरा दिला होता. पॅटरसननं त्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये 24 रन देत 5 विकेट्स घेतल्या होत्या. त्यांच्या बॉलिंमुळे टीम इंडिया पहिल्याच सत्रामध्ये फक्त 75 रनवर ऑल आऊट झाली होती. पॅटरसन यांच्या या कामगिरीमुळे वेस्ट इंडिजने दिल्ली टेस्ट जिंकली होती.
IPL 2021: उर्वरित मॅच घेण्यासाठी BCCI ची धावाधाव, ECB ला केली 'ही' विनंती
पॅटरसन यांनी 59 वन-डे 90 विकेट्स घेतल्या. तर फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्यांनी 497 विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, R ashwin, West indies player