मुंबई, 21 मे : आयपीएल स्पर्धेच्या बायो-बबलमध्ये झालेल्या कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे हा सिझन (IPL 2021) 29 मॅचनंतर स्थगित करावा लागला. या सिझनमधील 31 मॅच आणखी बाकी आहेत. उर्वरित मॅच झाल्या नाहीतर तर बीसीसीआयचे (BCCI) 2500 कोटींचे नुकसान होणार आहे. हा आर्थिक फटका टाळण्यासाठी बीसीसीआयनं इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाला (ECB) विनंती केली आहे.
'क्रिकइन्फो'नं दिलेल्या वृत्तानुसार भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील टेस्ट सीरिज एक आठवडा आधी सुरु करण्याची विनंती करणारे पत्र बीसीसीआयने इंग्लंडच्या क्रिकेट बोर्डाला लिहिले आहे. आयपीएल स्पर्धेचे आयोजन सप्टेंबरमध्ये करण्याचा बीसीसीआयचा विचार आहे. आयपीएलला अधिक वेळ मिळावा म्हणून बीसीसीआयचा प्रयत्न आहे. भारत विरुद्ध इंग्लंड टेस्ट सीरिज (India vs England Test Series 2021) नियोजित वेळापत्रकानुसार 4 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर या कालावधीमध्ये होणार आहे. ही सीरिज एक आठवडा आधी सुरू झाल्यास 7 सप्टेंबर रोजी संपेल.
3 आठवड्यात होणार 31 मॅच
भारत- इंग्लंड टेस्ट सीरिज 7 सप्टेंबर रोजी संपली तर सप्टेंबर महिन्यातील उर्वरित 3 आठवड्यांमध्ये आयपीएलच्या उर्वरित मॅच घेण्याची बीसीसीआयची योजना आहे. एका दिवसामध्ये दोन किंवा त्यापेक्षा जास्त मॅच घेतल्या जाऊ शकतात. ऑक्टोबर महिन्यात T20 वर्ल्ड कप असून या वर्ल्ड कपपूर्वी आयपीएल स्पर्धा घेण्याची बीसीसीआयची योजना आहे.
T20 World Cup 2021: भारतात नाही तर 'या' देशात होऊ शकते स्पर्धा, 1 जूनला निर्णय
ECB समोर पेच
इंग्लंड क्रिकेट बोर्ड 21 जुलै ते 21 ऑगस्ट या कालावधीमध्ये 'द हंड्रेड' या स्पर्धेचं आयोजन करणार आहे. भारत-इंग्लंड टेस्ट सीरिज लवकर संपवायची असेल तर बोर्डाला ब्रॉडकास्टरचे वेळापत्रक, हॉटेल, बायो-बबल आणि तिकीट विक्री या सर्वांची नव्याने तयारी करावी लागेल. असं असलं तरी, भारत आणि इंग्लंडच्या क्रिकेट बोर्डाचे संबंध चांगले आहेत. त्यामुळे बीसीसाीआयच्या विनंतीवरुन टेस्ट सीरिजमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BCCI, Cricket, India vs england, IPL 2021