Home /News /sport /

काय सांगता! महेंद्रसिंह धोनी नाही तर वीरेंद्र सेहवाग होता CSK ची पहिली चॉईस

काय सांगता! महेंद्रसिंह धोनी नाही तर वीरेंद्र सेहवाग होता CSK ची पहिली चॉईस

महेंद्रसिंह धोनीशिवाय (MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) टीमची कल्पना करणे देखील शक्य नाही. पण सीएसकेची पहिली चॉईस धोनी नाही तर सेहवाग होता असा धक्कादायक गौप्यस्फोट आता झाला आहे.

    मुंबई, 20 डिसेंबर : महेंद्रसिंह धोनीशिवाय (MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) टीमची कल्पना करणे देखील शक्य नाही. आयपीएलच्या पहिल्या सिझनपासून धोनी चेन्नईचा कॅप्टन आहे. त्याच्या कॅप्टनसीमध्येच चेन्नईनं चार वेळा आयपीएल स्पर्धेचं विजेतेपद पटकावले आहे. त्याचबरोबर या स्पर्धेतील एक यशस्वी टीम अशी ओळख निर्माण केली आहे. धोनी आतंरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला असला तरी सीएसके मॅनेजमेंटचा धोनीवरील विश्वास कायम आहे. आगामी आयपीएल सिझनसाठी (IPL 2022) त्यांनी धोनीला रिटेन केले असून तोच टीमचा कॅप्टन असेल. आयपीएल स्पर्धेच्या पहिल्या सिझनपूर्वी (IPL 2008) महेंद्रसिंह धोनी नाही तर वीरेंद्र सेहवाग (Virendra Sehwag) ही सीएसके मॅनेजमेंटची पहिली चॉईस होता. आज कुणालाही सहज विश्वास बसणार नाही, असा खुलासा सीएसकेचा माजी खेळाडू सुब्रमण्यम बद्रीनाथने (Subramaniam Badrinath) केला आहे. बद्रीनाथने त्याच्या यूट्यूब चॅनेलवर हा गौप्यस्फोट केला आहे. 'वीरेंद्र सेहवागपेक्षा चांगला खेळाडू कुणीही नाही, असं सीएसके मॅनेजमेंटचं मत होतं. पण दिल्लीकर सेहवागने दिल्ली डेअरडेव्हिल्स टीमकडून खेळण्यास पसंती दिली होती. त्यानंतर सीएसके मॅनेजमेंटनं पुलमधील अन्य खेळाडूंच्या नावाचा विचार केला. त्यादरम्यान टीम इंडियानं 2007 साली टी20 वर्ल्ड कप जिंकला होता. त्यामुळे सीएसकेने धोनीला करारबद्ध करण्याचा निर्णय घेतला.' असे त्याने स्पष्ट केले. ऋषभ पंतला टेस्ट सीरिजपूर्वी मिळाली Good News, CM नी फोन करत केला सन्मान, VIDEO आयपीएल स्पर्धेच्या पहिल्या सिझनपूर्वी झालेल्या लिलावात सेहवाग सहभागी झाला नव्हता. तो दिल्लीच्या टीमचा आयकॉन बनला होता. आयकॉन खेळाडूंना टीमने लिलावातील सर्वात महागड्या खेळाडूच्या किमतीपेक्षा 15 टक्के जास्त रक्कम देणे द्यावी लागली. चेन्नईनं लिलावापूर्वी कोणाताही आयकॉन खेळाडू निवडला नव्हता. त्याचा त्यांना थोडा फायदा झाला. चेन्नईनं सहा कोटी रूपयांमध्ये महेंद्रसिंह धोनीला खरेदी केले.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news, Csk, MS Dhoni, Virender sehwag

    पुढील बातम्या