मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

ऋषभ पंतला टेस्ट सीरिजपूर्वी मिळाली Good News, CM नी फोन करत केला सन्मान, VIDEO

ऋषभ पंतला टेस्ट सीरिजपूर्वी मिळाली Good News, CM नी फोन करत केला सन्मान, VIDEO

ऋषभ पंतने (Rishabh Pant) खूप कमी कालावधीत टीम इंडियात जागा निश्चत केली आहे. पंतच्या वाढत्या लोकप्रियतेचा फायदा घेण्यासाठी त्याचे गृहराज्य पुढे सरसावले आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 20 डिसेंबर : भारतीय क्रिकेट टीमचा (Team India) स्टार विकेट किपर-बॅटर ऋषभ पंतने (Rishabh Pant) खूप कमी कालावधीत टीम इंडियात जागा निश्चित केली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील विजयाचा शिल्पकार असलेल्या पंतकडे भारतीय क्रिकेटचं भविष्य म्हणून पाहिलं जात आहे. आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) टीमचा तो कॅप्टन आहे. पंत सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. त्या दौऱ्यातही त्याच्याकडून टीम मॅनेजमेंटला मोठी अपेक्षा आहे. पंतच्या लोकप्रियतेचा फायदा मिळवण्यासाठी त्याच्या गृहराज्यानं पुढाकार घेतला आहे.

उत्तराखंड (Uttarakhand) सरकारनं राज्याचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून पंतची नेमणूक केली आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी (Pushkar Singh Dhami) यांनी पंतला व्हिडीओ कॉल करून याची घोषणा केली आहे. पंतने ही जबाबदारी स्वीकारली असून धामी यांचे आभार मानले आहेत.

धामी यांनी याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियामध्ये शेअर केला आहे. त्यामध्ये त्यांनी सध्या दक्षिण आफ्रिकेत असलेल्या पंतचा चौकशी केली. त्याचबरोबर तो उत्तराखंडमध्ये कधी येणार आहे? याबाबत देखील विचारणा केली. पंतचा जन्म उत्तरखंडमधील हरिद्वारमध्ये झाला. त्यानंतर तो सध्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये दिल्लीचं प्रतिनिधित्व करत आहे.

'देशातील सर्वश्रेष्ठ खेळाडूंपैकी एक, तरूणांचा आदर्श आणि उत्तराखंडचा मुलगा ऋषभ पंतला राज्य सरकारनं ब्रँड अ‍ॅम्बेसेडर  म्हणून नियुक्त केले आहे. राज्यातील तरूणांमध्ये खेळ आणि आरोग्याबाबत जागृती व्हावी, हा आमच्या या निर्णयाचा उद्देश आहे.' अशी प्रतिक्रिया धामी यांनी सोशल मीडियावर व्यक्त केली आहे.

ऋषभ पंतनं आजवर  25 टेस्ट, 18 वन-डे आणि 41 टी20 इंटरनॅशनल मॅचमध्ये टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याचबरोबरतो अंडर 19 वर्ल्ड कप विजेत्या टीमचाही सदस्य होता. पंतनं त्याच्या आंतरराष्ट्रीय करियरमध्ये आजवर टेस्टमध्ये 1459, वन-डेत 529 आणि टी20 इंटरनॅशनलमध्ये 623 रन केले आहेत.

U-19 World Cup : मुलासाठी वडिलांनी नोकरी सोडली, पाहा कोण आहे भारताचा कॅप्टन यश ढूल?

First published:

Tags: Cricket, Rishabh pant, Uttarakhand