Home /News /sport /

एका फोन कॉलमध्ये झाला सर्वात मोठा निर्णय, वाचा राजीनाम्यापूर्वी विराट-गांगुलीमध्ये काय झाली चर्चा

एका फोन कॉलमध्ये झाला सर्वात मोठा निर्णय, वाचा राजीनाम्यापूर्वी विराट-गांगुलीमध्ये काय झाली चर्चा

विराट कोहलीनं (Virat Kohli) टी20 नंतर टेस्ट टीमची कॅप्टनसी सोडून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. विराटने राजीनामा देण्याचा निर्णय घेण्यापूर्वी काय-काय घडलं याचा घटनाक्रम समोर आला आहे.

    मुंबई, 17 जानेवारी : विराट कोहलीनं (Virat Kohli) टी20 नंतर टेस्ट टीमची कॅप्टनसी सोडून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. वन-डे टीमच्या कॅप्टनसीवरून हटवल्यानंतर या विषयाचा अंदाज व्यक्त केला जात होता. पण, हे इतक्या लवकर होईल असे कुणालाही वाटले नव्हते. भारताच्या सर्वात यशस्वी कॅप्टननं राजीनामा देण्याचा निर्णय घेण्यापूर्वी काय-काय घडलं याची सर्वांना उत्सुकता आहे. BCCI होते सज्ज विराट कोहलीच्या या राजीनामा प्रकरणाबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार विराट कोहलीला एकदाही या निर्णयाचा फेरविचार कर असा आग्रह बीसीसीआयकडून करण्यात आला नाही. केपटाऊन टेस्टमधील पराभवानंतर विराटने बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांना निर्णयाची माहिती दिली. विराटचा राजीनाम्याचा प्रस्ताव गांगुली यांनी लगेच मंजूर केला. बीसीसीआयने या विषयावर यापूर्वीच तयारी केली होती, हे यामधून स्पष्ट झाले आहे. 'द टेलीग्राफ' या इंग्रजी वृत्तपत्रातील वृत्तानुसार, 'विराटने शनिवारी दुपारी 1 वाजता म्हणजेच कॅप्टनसी सोडण्याचा निर्णय जाहीर करण्यापूर्वी काही तास बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शहा यांना या निर्णयाची कल्पना दिली. विराटचा हा निर्णय ऐकून त्यांना आश्चर्य वाटले. पण, त्यांनी यावेळी विराटला या निर्णयाचा फेरविचार करण्याची सूचना केली नाही. विराटने कॅप्टनसी सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे त्याचे नव वळवण्याचे प्रयत्न करण्यात काही अर्थ नव्हता. टी20 टीमची कॅप्टनसी सोडण्याच्या वादानंतर या विषयावर काहीही न बोलणे बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ठरवले,' असे या रिपोर्टमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. Virat Kohli Steps Down: टीम इंडियाच्या सर्वात यशस्वी कॅप्टननं आत्ताच पद का सोडले? 'ती' इच्छा अपूर्ण विराटने केपटाऊन टेस्ट संपल्यानंतर शुक्रवारी संध्याकाळी टीममधील सहकाऱ्यांना या निर्णयाची कल्पना दिली होती. ही बातमी सध्या स्वत:जवळच ठेवा, अशी विनंती विराटने त्यांना केली होती. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जातानाच विराटने हा आपला कॅप्टन म्हणून शेवटचा दौरा असेल, असे ठरवले होते, असे मानले जात आहे. विजयासह या प्रवासाचा शेवट करण्याची विराटची इच्छा होती, पण तसे झाले नाही.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: BCCI, Sourav ganguly, Virat kohli

    पुढील बातम्या