मुंबई, 17 डिसेंबर : टीम इंडियाच्या टेस्ट टीमचा कॅप्टन विराट कोहलीनं (Virat Kohli) दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाण्यापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेनं क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे. या पत्रकार परिषदेत विराटने बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी केलेला दावा खोडून काढला होता. त्यामुळे त्याला बीसीसीआय (BCCI) काय उत्तर देणार याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष लागलं आहे. बीसीसीआयनं याबाबतचे धोरण निश्चित केले आहे. मैदानाबाहेर घडणाऱ्या या घडामोडींचा कोणताही परिणाम टीम इंडियीच्या कामगिरीवर होणार नाही, याची काळजी घेण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय टीम सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. दोन्ही देशांमधील (India vs South Africa) टेस्ट सीरिजला 26 डिसेंबर रोजी सुरूवात होत आहे. बुधवारी जे घडलं त्यावर बीसीसीआय समाधानी नाही, पण याबाबत कोणतीही कठोर प्रतिक्रिया दिली तर नुकसान होऊ शकतं असं बोर्डाचं मत आहे. सौरव गांगुली यांनी या गुरुवारी या विषयावर कोणतीही थेट प्रतिक्रिय देणे टाळले. ‘कोणतेही वक्तव्य करणार नाही. पत्रकार परिषद होणार नाही. आम्ही आमच्या पद्धतीनं या प्रकरणाची हातळणी करू. हे सर्व बीसीसीआयवर सोडा.’ असे गांगुली यांनी स्पष्ट केले. सौरव गांगुली, बीसीसीआय सचिव जय शहा तसेच वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची बुधवारी ‘झुम’ कॉलवर झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बीसीसीआयच्या वरिष्ठ सूत्रांनी या प्रकरणात दिलेल्या माहितीनुसार, ‘हे प्रकरण अध्यक्षांच्या सन्मानाशी संबंधित आहे. या संवेदनशील विषयांवर अनुभवी व्यक्तींची प्रतिक्रिया जाणून घेतली आहे. आता लवकरच टेस्ट सीरिज होणार आहे. सध्या गडबडीत कोणतीही प्रतिक्रिया दिली तर त्याचा परिणाम टीमवर होऊ शकतो.’ विराट कोहलीनं कॅप्टनसी का गमावली? सुनील गावसकरांनी सांगितलं कारण अध्यक्ष आणि कॅप्टन या दोघांनी एकत्र बसून या विषयावर सामोपचाराने तोडागा काढावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. गांगुली आणि जय शहा हे विराटशी या विषयावर लगेच चर्चा करतील अशी शक्यता कमी आहे. साधारणत: बीसीसीआयशी करारबद्ध असलेल्या खेळाडूंकडून पदाधिकाऱ्यांच्या विरुद्ध कोणतीही प्रतिक्रिया देणे अपेक्षित नाही. पण, विराटने एका प्रश्नाच्या उत्तरात प्रतिक्रिया दिली होती. त्यामुळे त्याने नियमभंग केला आहे की नाही? याचा निर्णय लवकर होण्याची शक्यता नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.