मुंबई, 16 डिसेंबर : .विराट कोहलीला (Virat Kohli) वन-डे टीमच्या कॅप्टनसीवरुन हटवण्यात आल्यापासून सुरू असलेला वाद अजूनही कायम आहे या प्रकरणात आठवडाभर वेगवेगळी चर्चा सुरू होती. त्यानंतर विराटने बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत याबाबतचा खुलासा केला. विराटच्या स्पष्टीकरणानंतरही ही चर्चा संपलेली नाही. विराटला वन-डे टीमच्या कॅप्टन पदावरून का हटवण्यात आले? याचे कारण टीम इंडियाचे माजी कॅप्टन सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी सांगितले आहे.
विराटला 'ती' चूक भोवली
विराट कोहलीच्या पत्रकार परिषदेनंतर 'इंडिया टुडे'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये गावसकरांनी विराटची चूक कुठे झाली हे सांगितले आहे. 'मी त्याने टी20 टीमचे कर्णधारपद सोडताना केलेले वक्तव्य वाचले. त्यामध्ये त्याने लिहलेली एक ओळ कदाचित बीसीसीआमध्ये सत्तेवर असलेल्या मंडळींना आवडली नसावी. त्याने मी वन-डे आणि टेस्ट टीमची कॅप्टनसी करेन असे लिहिले होते. माझ्या मते त्याने मी वन-डे आणि टेस्ट टीमसाठी उपलब्ध असेल असं लिहायला हवं होतं.
निवड समितीनं विराटला त्याला हटवण्याबाबतची कल्पना दिली होती. त्यामुळे या प्रकरणावर आता वाद होण्याची गरज नाही. विराटला मीडियातून समजले असते तर ते चुकीचे ठरले असते. खेळाडूंनी या सर्व वादापासून दूर राहावे.' असे मत गावसकर यांनी व्यक्त केले.
काय म्हणाला होता विराट?
दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टेस्ट टीमची घोषणा व्हायच्या दीड तास आधी मला वनडे टीमच्या कॅप्टन्सीवरून हटवण्यात आल्याचं सांगण्यात आलं, असं विराट म्हणाला. टी-20 टीमची कॅप्टन्सी सोडण्याआधी आपण बीसीसीआयला याबाबत माहिती दिली, पण याबाबत बीसीसीआयसोबत काहीच बोलणं झालं नाही, असा दावा विराटने केला.
विराट कोहलीनं मुलगी वामिकाबद्दल केलं आवाहन, मुंबई विमानतळावरचा Photo Viral
निवड समितीला टी-20 आणि वनडे टीमसाठी एकच कर्णधार हवा होता, असं गांगुली म्हणाला होता. विराट कोहलीने मात्र त्याच्या पत्रकार परिषदेत वेगळंच सांगितलं. टी-20 टीमची कॅप्टन्सी सोडल्यानंतर माझं या मुद्द्यावर बीसीसीआयशी कोणतंही बोलणं झालं नाही. मला कधीही टी-20 टीमचं नेतृत्व सोडू नकोस, असं सांगण्यात आलं नाही, असं स्पष्टीकरण विराट कोहलीने दिलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BCCI, Sourav ganguly, Sunil gavaskar, Virat kohli