मुंबई, 26 मे : टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) इंग्लंड दौऱ्यासाठी तयार करण्यात आलेल्या बायो-बबलमध्ये दाखल झाला आहे. या क्वारंटाईन कालावधीमध्ये विराटनं स्वत:ला फिट होण्यासाठी तयारी सुरु केली आहे. क्रिकेटच्या मैदानावर नवे रेकॉर्ड करणाऱ्या विराटनं फुटबॉलनं तयारी सुरु केली आहे. त्याने याबाबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) शेअर केला आहे. विराट कोहलीने जो व्हिडीओ शेअर केलाय त्यात तो फुटबॉलचा सराव करत आहेत. यावेळी तो एका किकच्या मदतीने गोल करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याने गोल करण्याचा चांगला प्रयत्न केला, पण त्याने मारलेला फटका सरळ गोलपोस्टच्या वरच्या कॉर्नरला लागला.
Accidental crossbar challenge 😂 pic.twitter.com/koeSSKGQeb
— Virat Kohli (@imVkohli) May 25, 2021
छेत्रीने मागितली फिस विराट कोहलीनं गोल करण्याचा केलेला प्रयत्न चांगलाच व्हायरल (Viral) झाला आहे. त्याने यावेळी सर्वांना या प्रकारे गोल करण्याचे चॅलेंज देखील दिले आहे. विराटच्या फुटबॉल किकचा व्हिडीओ भारताचा फुटबॉलपटू सुनील छेत्री (Sunil Chhetri) याने पाहिला. तो पाहून त्याला विराटसमोर एक प्रस्ताव ठेवला आहे. छेत्रीनं ट्विट करत म्हंटलं आहे की, “सर्व कोचिंगच्या फिसचे बिल एकत्र पाठवू की हप्त्यामध्ये देशील चॅम्प?''
Saare coaching sessions ka ek hi invoice bheju, ya aasan kishton mein chukaoge, champ? 😉 https://t.co/i98I9a9Nmq
— Sunil Chhetri (@chetrisunil11) May 25, 2021
आईचा कोरोनामुळे मृत्यू, आता ऑक्सिजन सिलेंडर वाटून मदत करतोय हा खेळाडू इंग्लंड दौऱ्यासाठी विराट कोहलीसह रोहित शर्मा (Rohit Sharma), रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) हे खेळाडू मंगळवारी बायो-बबलमध्ये दाखल झाले. बायो-बबलमध्ये उशीरा प्रवेश केलेल्या खेळाडूंसाठी वेगळी व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. या खेळाडूंना 7 दिवसांचा क्वारंटाईन पूर्ण करावा लागणार आहे. तोपर्यंत त्यांना टीम इंडियाच्या इतर खेळाडूंना भेटता येणार नाही. विराट आणि रोहितसह अन्य खेळाडू टीम ज्यादिवशी इंग्लंडला रवाना होईल तेव्हाच टीमशी जोडले जातील, अशी माहिती बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने दिली आहे.