जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / आईचा कोरोनामुळे मृत्यू, आता ऑक्सिजन सिलेंडर वाटून मदत करतोय हा खेळाडू

आईचा कोरोनामुळे मृत्यू, आता ऑक्सिजन सिलेंडर वाटून मदत करतोय हा खेळाडू

आईचा कोरोनामुळे मृत्यू, आता ऑक्सिजन सिलेंडर वाटून मदत करतोय हा खेळाडू

दोन आठवड्यांपूर्वी कोरोनामुळे (Corona Virus) आईचं निधन झालेला खेळाडू आता गरजूंना ऑक्सिजन सिलेंडरचं वाटप करत आहे. एटीके मोहन बगानचा गोलकीपर अरिंधम भट्टाचार्यच्या (Arindam Bhattacharya) आईचा दोनच आठवड्यांपूर्वी कोरोनामुळे मृत्यू झाला.

  • -MIN READ
  • Last Updated :

कोलकाता, 25 मे : दोन आठवड्यांपूर्वी कोरोनामुळे (Corona Virus) आईचं निधन झालेला खेळाडू आता गरजूंना ऑक्सिजन सिलेंडरचं वाटप करत आहे. एटीके मोहन बगानचा गोलकीपर अरिंधम भट्टाचार्यच्या (Arindam Bhattacharya) आईचा दोनच आठवड्यांपूर्वी कोरोनामुळे मृत्यू झाला. आता इंडियन सुपर लीगचा हा स्टार खेळाडू आपला स्थानिक क्लब अटलांटासाठी कोरोना योद्धा म्हणून ऑक्सिजन सिलेंडर आणि जेवणाची सोय करत आहे. अरिंधमने एका वर्षातच आई आणि वडिलांना गमावलं आहे. आईच्या मृत्यूनंतर सगळे विधी केल्यावर अरिंधम कोरोनाविरुद्धच्या लढाईत मैदानात उतरला. अरिंधमला या वर्षी गोल्डन ग्लोव्ह पुरस्कारही मिळाला होता. आपल्या क्लबसोबत या लढाईमध्ये उतरलेला अरिंधम पीटीआय भाषाशी बोलताना म्हणाला, ‘कोरोनामुळे आई गमावणं काय असतं, ते मी जाणतो. एका वर्षाच्या आत मी आई आणि वडिलांना गमावलं. माझ्यासाठी स्वत:ला घरात कोंडून घेणं सोपं होतं, पण मी काही तरी करू शकतो, याची जाणीव झाली आणि मी क्लबशी जोडला गेलो.’ दक्षिण कोलकात्याच्या गोल्फ रोडवर असलेला हा क्लब कोरोनाग्रस्तांना मदत करत आहे. क्बलमध्ये 9 बेड आणि 26 ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध आहेत. अरिंधमने सोशल मीडियावरून नागरिकांनाही या मिशनमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. ‘ज्यांना घरी क्वारंटाईन होता येत नाही, तसंच ज्यांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज नाही, त्यांच्यासाठी आम्ही हे काम करत आहोत. आतापर्यंत क्लबमधून 14 रुग्ण बरे होऊन घरी परतले आणि तीन-चार जणांना रुग्णालयात दाखल करावं लागलं,’ असं अरिंधम भट्टाचार्य म्हणाला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात