मुंबई, 15 सप्टेंबर : टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) हो एक 'पॉवर कपल' मानले जाते. क्रिकेट आणि बॉलिवूडमध्ये आघाडीवर असलेली ही जोडी सेवाभावी काम करण्यासाठी नेहमीच आघाडीवर असते. त्यांनी विराट कोहली फाऊंडेशनच्या मदतीनं मुंबईतील मालाडमध्ये भटक्या जनावरांसाठी पुनर्वसन केंद्र सुरु केलं आहे. विराटनं याबाबतची माहिती दिली आहे.
विविल्डस आणि आवाज या दोन स्वयंसेवी संस्थांच्या मदतीनं या कामाला सुरुवात केल्याची माहिती विराटनं ट्विट करत केली आहे. जखमी झालेल्या भटक्या जनावरांवरील उपचार आणि त्यांच्यावर तज्ज्ञांच्या मार्फत देखभाल करण्याचं काम या संस्थेच्या माध्यमातून होणार आहे. या कामाची प्रेरणा दिल्याबद्दल विराट कोहलीनं त्याची पत्नी अनुष्का शर्माची प्रशंसा केली आहे.
'जनावरांबद्दल अनुष्काच्या समर्पित वृत्तीनं मला प्रेरणा दिली आहे. शहरातील भटक्या जनावरांसाठी सुरक्षित घर बनवण्याचं आमचं स्वप्न आहे. त्यासाठी एक केंद्र तयार आहे, अशी घोषणा आम्ही करत आहोत. या माध्यमातून बदल घडेल, अशी आशा आहे.' असं विराटनं म्हंटलं आहे.
We are proud to announce that after months of hard work, our Trauma & Rehab Centre for Stray Animals in association with Vivaldis & Awaaz is now ready for operations. The Malad centre will treat injured stray animals & provide them with medical support#VKF #AllLivesMatter pic.twitter.com/Vwvlg8fNKe
— Virat Kohli (@imVkohli) September 14, 2021
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा सध्या यूएईमध्ये आहेक. विराट आयपीएलमधील (IPL 2021) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) टीमचा कॅप्टन आहे. आयपीएल स्पर्धेचा दुसरा टप्पा 19 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. आरसीबीची पहिली लढत कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरुद्ध 20 सप्टेंबर रोजी होणार आहे. या मॅचमध्ये आरसीबीची टीम निळ्या जर्सीमध्ये मैदानात उतरेल. कोरोना वॉरियर्सबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पीपीई किटच्या रंगाशी साधर्म्य असणारी ही जर्सी आहे.
IPL 2021: धोनीचं टेन्शन वाढलं, मुंबई विरुद्धच्या मॅचमध्ये खेळणार नाही महत्त्वाचा खेळाडू!
या जर्सीवर खेळाडूंचे नाव आणि नंबरसह कोरोना वॉरियर्सचे आभार मानण्यासाठी खास मेसेज देखील लिहिण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Anushka sharma, Virat kohli