Home /News /sport /

IPL 2021: धोनीचं टेन्शन वाढलं, मुंबई विरुद्धच्या मॅचमध्ये खेळणार नाही महत्त्वाचा खेळाडू!

IPL 2021: धोनीचं टेन्शन वाढलं, मुंबई विरुद्धच्या मॅचमध्ये खेळणार नाही महत्त्वाचा खेळाडू!

आयपीएल स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्याची (IPL 2021, Phase 2) सुरूवात मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (Mumbai Indians vs Chennai Super Kings) या मॅचनं होणार आहे. या मॅचपूर्वी महेंद्रसिंह धोनीचं (MS Dhoni) टेन्शन वाढलं आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 15 सप्टेंबर : आयपीएल स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्याची (IPL 2021, Phase 2) सुरूवात मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई  सुपर किंग्स (Mumbai Indians vs Chennai Super Kings) या मॅचनं होणार आहे. या सिझनच्या पहिल्या टप्प्यात कायरन पोलार्डच्या (Kieron Pollard) वादळी खेळीमुळे मुंबईनं पहिल्या टप्प्यात चेन्नईचा पराभव केला होता. या पराभवाचा बदला घेण्यासाठी महेंद्रसिंह धोनीची टीम (MS Dhoni) रविवारी मैदानात उतरेल. पण त्यापूर्वी त्यांची अडचण वाढली आहे. चेन्नई सुपर किंग्सचा ऑल राऊंडर सॅम करन (Sam Curran) मुंबई विरुद्धची मॅच खेळण्याची शक्यता कमी आहे. चेन्नईचा हा भरवशाचा ऑल राऊंडर अजून यूएईमध्ये दाखल झालेला नाही. तो भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात झालेल्या टेस्ट सीरिजमध्ये इंग्लंड टीमचा सदस्य होता. करनला यूएईच्या नियमानुसार 6 दिवस क्वारंटाईन राहणे आवश्यक आहे. त्यामुळे तो रविवारी होणाऱ्या मॅचमध्ये खेळण्याची शक्यता कमी आहे. चेन्नईच्या टीममध्ये फाफ डुप्लेसिस, ड्वॅन ब्राव्हो, इम्रान ताहीर सीपीएलमध्ये तर लुंगी एनगिडी श्रीलंकेविरुद्धच्या सीरिजमध्ये खेळत आहेत. मुंबईचा कायरन पोलार्ड सीपीएलमध्ये आणि क्विंटन डिकॉक श्रीलंकेत खेळत आहे. VIDEO: IPL पूर्वी अनिल कुंबळेचा दिसला हटके अवतार! रोमँटीक गाणं गात गाजवली मैफील युएईमधून आल्यानंतर या सगळ्या खेळाडूंना दोन दिवस क्वारंटाईन व्हावं लागणार आहे. दोन दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण केल्यानंतर खेळाडू आयपीएल टीममध्ये दाखल होतील. बबल टू बबल ट्रान्सफर असल्यामुळे या खेळाडूंसाठी सहा दिवस क्वारंटाईनचा नियम लागू होणार नाही. युएईमध्ये दाखल झाल्यानंतर खेळाडू लगेच हॉटेल रूममध्ये आयसोलेट होतील. यानंतर दुसऱ्या दिवशी खेळाडूंची कोरोना टेस्ट केली जाईल. कोरोना टेस्टचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरच त्यांना टीममध्ये जाता येईल. त्यामुळे पोलार्ड आणि डिकॉक यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर ते दोघंही पहिला सामना खेळण्यासाठी उपलब्ध असतील.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news, Csk, IPL 2021

    पुढील बातम्या